जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वितरिका क्रमांक १ व २ च्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवा- आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्रमांक १ व २ साठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी त्वरित प्रस्ताव पाठवा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे (वैजापूर)विभागाचे उपअभियंता रवींद्र पाटील यांना दिल्या आहे.

कोपरगाव तालुक्यातील लौकी, धोत्रे, तळेगाव मळे, घोयेगाव, खोपडी व गोधेगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिका क्रमांक १ व २ साठी अनेक वर्षांपासून संपादित केल्या आहेत. मात्र आजपर्यंत या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून मोबदला मिळालेला नाही.याबाबत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी आ.काळे यांच्याकडे मांडल्या होत्या. याची दखल घेवून आ.काळे यांनी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता रवींद्र पाटील यांची नुकतीच कोपरगाव येथे शेतकऱ्यांसह बैठक घेतली.

या वेळी संजय जामदार, देवेश माळवदे, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, गणेश घाटे, राजेंद्र माळवदे, श्रावण माळवदे, तात्यासाहेब काटे, प्रवीण चव्हाण, भाऊराव देवकर, सचिन क्षिरसागर, राजेंद्र माने आदी शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत बोलतांना आ.काळे म्हणाले की, या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी पाठविलेला प्रस्ताव अनेक वेळा त्रुटी असल्यामुळे परत आला. नगर भु संपादन कार्यालय व नांदूर मधमेश्वर जलद कालवा बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार मोबदला देण्यात यावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. शेतकऱ्यांना लवकरांत लवकर मोबदला मिळावा यासाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन बैठकीसाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close