जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…त्या चोरीतील आरोपी तालुका पोलिसानी पकडला

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील फिर्यादी पंढरीनाथ कारभारी घुले (वय-५७) यांच्या जुलै २०१९ मध्ये झालेल्या एल.सी.डी. टि. व्ही. सोन्याचे दागिने, कपडे,मिक्सर,कुकर,असा ८५ हजार ५०० रुपयांच्या चोरीतील आरोपी शाहरुख उर्फ माछिंद्र वाघ रा.माहेगाव ता.कोपरगाव यास कोपरगाव तालुका पोलिसांनी मिळालेल्या गुप्त खबरीवरून कोपरगाव शहरातील दत्तनगर परिसरात आल्याची खबर मिळाल्या वरून टाकलेल्या धाडीत त्याला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असेकी, कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंच्यात हद्दीत राहिवाशी असलेले व सध्या गोरेगाव मुंबई येथे रहात असलेले इसम पंढरीनाथ घुले यांच्या घरी ९ जुलै ते १० जुलै दरम्यान घरातील दूरदर्शन संच, सोन्याचे दागिने,कपडे,मिक्सर कुकर असा रुपये ८५ हजार ५०० रुपयांची चोरी अज्ञात चोरट्याने केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला होता.या गुन्ह्यांचा तपास उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके हे करीत होते.दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना नुकतीच गुप्त खबरी कडून बातमी मिळाली कि कुंभारी येथील चोरीतील आरोपी हा दत्तनगर कोपरगाव येथे आला सून तो कायम फिरस्ता असतो.त्यांची अचूक संधी साधत त्यांनी आपले सहकारी सहाय्यक फौजदार महेश कुसारे, पोलीस नाईक असिर सय्यद, अशोक शिंदे,प्रमोद जाधव, फुरकान शेख,गोकुळदास पळसे, इरफान शेख यांनी समक्ष जाऊन आरोपी शाहरुख वाघ याला ताब्यात घेतले.त्याच्या कडून दूरदर्शन संच, भ्रमणध्वनी, जिल्हा परिषद शाळेतील प्रोजेक्टर,त्याचे अर्धवट जळालेला भाग असा ऐवज जप्त केला असून त्याचा सहकारी कपिल उर्फ तोताराम पिंपळे हा राहत्या घरातून पळून गेला आहे.त्याच्या मागावर तालुका पोलीस असल्याची माहिती आहे.पोलिसांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close