नगर जिल्हा
पत्रकार नेहे यांची प्रेस रिपोर्टर असोशिएशनच्या जिल्हा संघटक पदी निवड
न्यूजसेवा
शिर्डी (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील लोहगाव ( प्रवरानगर) येथील पत्रकार कोंडीराम परसराम नेहे यांची इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे.भारत सरकार मान्यता प्राप्त इंटरनॅशनल प्रेस रिपोटर असोसिएशनची बैठक नुकतीच सातारा जिल्हा येथे संपन्न झाली.यावेळी संघटनेचे राज्य भरातून पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर जिल्हा संघटक पदी कोंडीराम नेहे यांची पत्रकारिता क्षेत्रातील व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची यावेळी जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण,राष्ट्रीय उपाध्यक्ष रणवीर गायकवाड,यांच्या उपस्थित हि निवड करण्यात आली आहे.यावेळी त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे .
जाहिरात-9423439946