जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातील २८ उपकरणांची राज्यस्तरावर निवड                                        

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल येथे आयोजित इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातील अहमदनगर जिल्हयातील १३ व सोलापुर जिल्हयातील १५ अशा २८ उपकरणांची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.

अहमदनगर जिल्हयातील स्वराज सरोदे, अनिकेत कांडेकर, सार्थक सोनवणे, अर्जकौर वाघवा, कावेरी जाधव, ऋतुराज आसने, धनंजय लोणारी, सुरज राठोड, आशिष निर्मळ, भोर संस्कार, ईश्वरी रोहकले, आर्या काशिद, किरण घोडके तर सोलापुर जिल्हयातील प्रविण सांवत, पायल गवळी, गुणगे फरहान, सप्तमी सुतार, वासिम ताहुरा, कुणाल सुरवसे, समिक्षा पाटील, सानिया शेख, अजय व्हनमाने, केदार कामतकर, सानिका कारंडे, स्वप्नाली भोसले, प्रशांत बाबर, अजय सुर्वे, आरोही मदने यांच्या उपकरणांची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.

नवी दिल्ली येथील केंद्र सरकाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित ९ व्या इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, विद्यालयाचे प्राचार्य निरंजन डांगे, विस्तार अधिकारी राजेंद्र पवार, शबाना शेख, मिनाक्षी पेंडभाजे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी राजेंद्र पवार यांनी केले तर सूत्रसंचालन नयना शेटे यांनी केले.

राज्यस्तरावर निवडले गेलेले विद्यार्थ्यांचे परमानंद महाराज, निजानंद महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, प्रभाकर जमधडे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close