जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

साईबाबा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न  

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दि.१८ ते २४ डिसेंबर या कालावधीत संपन्न झालेल्या या शिबिरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राहाता आणि श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी या दोन्ही महाविद्यालयांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या वर्षी क्लस्टर केले आणि दोन महाविद्यालये मिळून या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटचे संचालक ज्ञानदेवराव म्हस्के, रघुनाथराव बोठे, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ आकाश किसवे,दिलीप उगले, सरपंच सचिन मुरादे,उपसरपंच उषाताई मुजमुले, प्राचार्य डॉ बी.के.सलालकर,प्राचार्य विकास शिवगजे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.या शिबिराचा समारोप समारंभ धनश्री विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमास गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,रावसाहेब लावरे, प्रकाश मुरादे,अधिक्षक राजेंद्र कोते,दिनेश कानडे, सरपंच सचिन मुरादे,उपसरपंच उषाताई मुजमुले, प्राचार्य डॉ बी.के.सलालकर,प्राचार्य विकास शिवगजे आणि महाविद्यालयीन कर्मचारी-विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धनश्री विखे म्हणाल्या की,” विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून मोठे व्हावे,आपल्या आईवडिलांची सेवा करावी,समाजातील अपप्रवृत्तीना प्रतिबंध करावा.मोठ्यांचा सन्मान करावा. समाजात आपले नाव मोठे होतांना आपल्या आईवडिलांचे, शाळेचे, महाविद्यालयाचे,गावाचे नाव मोठे होते.

शिबिर कालावधीत डॉ संतोष खेडलेकर यांनी ‘सोशल मिडिया आणि आपण’,डॉ आकाश किसवे यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’,ब्रह्मकुमारी वर्षा दीदी यांनी ‘महिला सबलीकरण’, सतिष वैजापूरकर यांनी ‘विनोदाकडून जनजागृतीकडे’ आणि संतोष उबाळे यांनी ‘एड्स जनजागृती’ या विषयावर व्याख्यान दिले. प्रा. सोनाली हरदास व डॉ जयश्री दिघे यांनी सूत्रसंचलन केले.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.दादासाहेब डांगे,डॉ व्ही आर पावडे,डॉ संतोष औताडे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले व सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close