जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

….या रस्त्यावरुन झाली उभ्या ट्रकची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर-पुणतांबा रोडवर गोंडेगाव परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला लावलेला माल ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने श्रीरामपूर तालुक्यात वाहन धारकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी रात्री १.२० वाजेच्या सुमारास ट्रक नं. एम.एच.२०-डीई-४५४५ हा चालकाने श्रीरामपूर ते पुणतांबा जाणार्‍या रोडवर गोंडेगाव परिसरामध्ये उभा केला होता. त्यावेळी कुणीतरी अज्ञात चोरट्याने हा उभा असलेला ट्रक चोरुन नेला.याप्रकरणी महंमदखान अलीयार खान (रा- मालेगाव, हकीमनगर, जायमेतूल गल्ली नं.८) यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ए.जे. गायकवाड हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close