जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

गौतम सहकरी बँकेच्या वतीने “असोसिएशन आपले द्वारी”कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यातील नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने “असोसिएशन आपले द्वारी” या कार्यक्रमांतर्गत अ.नगर जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकेचे बैठक नुकतीच गौतम सहकारी बँकेच्या कोपरगाव शाखा कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष घैसास हे होते.

सदर बैठकीत बँकांची ध्येयधोरणे, नागरी बंकेसाठी येणाऱ्या अडीअडचणी, आयकर प्रणाली, जी.एस.टी. ठेव व कर्ज, व्याजदरातील विसंगती, बँकांपुढे येऊ घातलेले प्रश्न, एन.पी.ए. व वसूली व्यवस्थापन, नोकरभरती, सहकार खाते व आर.बी.आय. कडील विविध परिपत्रके आदी विषयांवर चर्चा झाली.

सदर कार्यक्रमास कोपरगावचे नवोदित आ. आशुतोष काळे,अ.नगर जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे,उद्योगपती कैलास ठोळे,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे,असोसिएशनचे संचालक अशोक कुरापट्टी आदी मान्यवरांसह बहुसंख्येने बँकेशी संबंधित पदाधिकारी,अधिकारी बहू संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते व उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी केले. सदर कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व बँकेचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून, दीप प्रज्वलन करून केले. सदर बैठकीत बँकांची ध्येयधोरणे, नागरी बंकेसाठी येणाऱ्या अडीअडचणी, आयकर प्रणाली, जी.एस.टी. ठेव व कर्ज, व्याजदरातील विसंगती, बँकांपुढे येऊ घातलेले प्रश्न, एन.पी.ए. व वसूली व्यवस्थापन, नोकरभरती, सहकार खाते व आर.बी.आय. कडील विविध परिपत्रके आदी विषयांवर चर्चा झाली. बैठकीचे सूत्रसंचलन असोसिएशनचे संचालक अशोक कुरापट्टी यांनी केले. तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close