जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील रस्त्यावरील गतिरोधक जीवघेणे-पालिकेत दुरुस्तीची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधीं)

कोपरगाव शहरातील रस्त्यावर निर्माण करण्यात आलेले गतिरोधक वाहनांची गती कमी करण्याऐवजी प्रवाशांचे आयुष्य व अनेकांचा जीव घेण्याचे काम करत असल्याने या गतिरोधकांची दुरुस्ती करून शहरातील नागरिकांचे त्यामुळे होणारे अपघात कमी करावे अशी मागणी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कैलास जाधव यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे नुकतीच एका बैठकीत केली आहे.

कोपरगाव शहरात काही रस्त्यांची कामे झाली आहेत मात्र त्यावरील गतिरोधक असून अडचण,नसून खोळंबा ठरत असून अनेक अपघातांना निमंत्रण ठरत आहेत.अनेकांना आपले शारीरिक व वाहनांचे वित्तीय नुकसान सोसावे लागत आहे.नवशिके वाहनधारक व महिला वाहनचालक हे दुचाकीवरून जात असताना या गतिरोधकावर हमखास अपघातग्रस्त होत आहे.त्यामुळे एखाद्या अकुशल मजुरासारखे उभारलेले गतिरोधक तातडीने बदलावे किंवा त्यांची उंची कमी करून ते सुरक्षित कसे होतील याचा शहर अभियंत्यानीं विचार करावा-जाधव

कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी कोपरगाव शहरातील चौदाव्या वित्त आयोगाच्या व जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत प्राप्त निधीतून विविध विकास कामे करण्याचा विषय सभापटलावर चर्चेसाठी ठेवण्यात आला होता.त्यावेळी बैल बाजार निकृष्ठ रस्त्याचा विषय त्या प्रभागातील नगरसेवक आरिफ कुरेशी यांनी उपस्थित केला होता त्यावेळी पुरवणी प्रश्नात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

वेगाची मर्यादा न पाळता वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांना आवर घालण्यासाठी आणि होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक बसविले जात असले तरी या गतिरोधकांसाठीचे नियम पाळले जात नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच नियमांचे पालन करत गतिरोधक बसविण्याची कोपरगाव शहरातील नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.

त्यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, भाजप,राष्ट्रवादीचे नगरसेवक,शहर अभियंता बी.एस.वाघ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी त्यांनी शहरात काही रस्त्यांची कामे झाली आहेत मात्र त्यावरील गतिरोधक असून अडचण,नसून खोळंबा ठरत असून अनेक अपघातांना निमंत्रण ठरत आहेत.अनेकांना आपले शारीरिक व वाहनाचे वित्तीय नुकसान सोसावे लागत आहे.नवशिके वाहनधारक व महिला वाहनचालक हे दुचाकीवरून जात असताना या गतिरोधकावर हमखास अपघातग्रस्त होत आहे.त्यामुळे एखाद्या अकुशल मजुरासारखे उभारलेले गतिरोधक तातडीने बदलावे किंवा त्यांची उंची कमी करून ते सुरक्षित कसे होतील याचा शहर अभियंत्यानीं विचार करावा अशी मागणीही त्यांनी केली व बैल बाजार रस्त्याचे काम करताना खंदक नाल्यावर पूल का बांधला नाही,रस्त्याचे काम परत-परत होत नसल्याचा दावा केला.त्यावेळी शहर अभियंता बी.एस.वाघ यांनी आपण तसा आदेश संबंधित ठेकेदाराला दिला असल्याचे सांगितले.त्यावेळी भाजपचे गटनेते रवींद्र पाठक यांनी झोपडपट्टीतील रस्ते घेण्याची मागणी लावून धरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close