जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

राहाता येथे पोलिसांवर गोळीबार,एक अटकेत

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

शिर्डी पासून जवळच असणाऱ्या राहाता नगरपंचायत हद्दीत चितळी रस्त्यावर तोंड बांधून आपल्या दुचाकीवर संशयित रित्या प्रवास करणाऱ्या दोन तरुणानां पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यानीं थेट कर्तव्यावर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल अजित पठारे यांच्यावरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणी राहाता पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणांचा पाठलाग करून सचिन साठे नामक आरोपीस जेरबंद केले आहे.या घटनेने राहाता परिसरात खळबळ उडाली आहे.

राहाता, शिर्डी परिसरात सध्या साखळी व दागिने ओरबडणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्यावर पोलिसांचा कुठलाही धाक राहिला नाही. शिर्डी हे शहर रेल्वेने जोडले गेल्यापासून येथे देशभरच्या गुन्हेगारांचा जोर वाढला आहे.त्यावर नियंत्रण मिळवणे पोलिसांना कठीण जात आहे.हे गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर विमान किंवा तत्सम वाहनाने परागंदा होत आहे.व पोलिसांचे दुसरीकडे लक्ष गेल्यावर पुन्हा डल्ला मारत आहे.त्याचा दाहक अनुभव नुकताच राहाता शहरातील नागरिकांना आला आहे.

राहाता, शिर्डी परिसरात सध्या साखळी व दागिने ओरबडणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्यावर पोलिसांचा कुठलाही धाक राहिला नाही. शिर्डी हे शहर रेल्वेने जोडले गेल्यापासून येथे देशभरच्या गुन्हेगारांचा जोर वाढला आहे.त्यावर नियंत्रण मिळवणे पोलिसांना कठीण जात आहे.हे गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर विमान किंवा तत्सम वाहनाने परागंदा होत आहे.व पोलिसांचे दुसरीकडे लक्ष गेल्यावर पुन्हा डल्ला मारत आहे.त्याचा दाहक अनुभव नुकताच राहाता शहरातील नागरिकांना आला असून राहाता पोलीस ठाण्यात आपल्या कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे व त्यांचे सहकारी हे आपल्या कर्तव्यावर असताना त्यांना चितळी रस्त्यावर एक संशयित तरुणांची दुचाकी तोंड बांधून प्रवास करताना वाढल्याने त्यांनी त्यास थांबविण्यास सांगितले असता त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल पठारे यांना त्याबद्द्ल संशय वाढल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास प्रारंभ केला असता त्याने व त्याच्या सहकाऱ्याने उलट पोलिसावरच गोळीबार केला गोळीबार केलेली गोळी पठारे यांच्या कानाला चाटून गेली असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहे.दरम्यान पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यास जेरबंद केले असून आरोपी हा श्रीरामपूर येथील असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान या घटनेने सामान्य माणसामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.जखमी पोलीसास शिर्डी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close