कोपरगाव तालुका
दोन डिसेंबर पासून संत जनार्दन स्वामी महाराज पुण्यतिथीचे आयोजन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले गेलेले राष्ट्रसंत जनार्धन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या 30 व्या पुण्यतिथीचे येत्या सोमवार दि.2 डिसेंबरला आयोजन करण्यात आले असून या निमित्त जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या काशीविश्वानाथ ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांनी जनशक्तीला न्यूजला दिली आहे.
संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचा जन्म कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील असून त्यांचे मूळगाव वैजापूर तालुक्यातील दहेगावं आहे.त्यांच्या आईचे नाव म्हाळसादेवी होते तर त्यांचे बालपणीचे नाव “नारायण” होते.त्यांची प्रारंभापासून अध्यात्माकडे ओढ होती त्यांनी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले व उभे आयुष्य समाजासाठी वाहून घेतले.त्यांनी परश्री मातेसमान मानली व समाजाला तसे करण्यास भाग पाडले. गोसंवर्धन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले त्यांनी आश्रमांची उभारणी करून तेथे रंजल्या गांजल्या उपेक्षितांना आश्रय दिला.
संत जनार्धन स्वामी यांनी शेवटी 1989 साली कोपरगाव येथील कोपरगाव बेट येथे समाधी घेतली.त्याला आता तीस वर्षाचा कालखंड लोटला आहे.कोपरगाव येथे त्यांनी भगवान महादेवाचे मंदिर आपल्या हयातीतच बांधले व त्या शेजारीच समाधी घेतली.त्याठिकाणी आता काशीविश्वेश्वर महादेव व गोपालन ट्रस्ट चालू असून या ट्रस्ट मार्फत विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.येत्या सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी येथे त्यांच्या पुण्यतिथीचे आयोजन केले आहे.त्यानिमित्त नऊ डिसेंबर पर्यंत रोज पहाटे पाच वाजता नीत्यनियम विधी,सकाळी सहा वाजता मान्यवर संतांचा सत्संग, सकाळी साडे सात वाजता आरती.दहा वाजता ज्ञानसत्र व एक तास प्रवचन,दुपारी चार वाजता भजन सत्संग,संध्याकाळी साडेसात वाजता आरती, रात्री आठ वाजता प्रवचन,कीर्तन आयोजित केले आहे.या वर्षी ह.भ.प. कांचनताई जगताप,उमेश महाराज उपाध्ये,आदींचे कीर्तन आयोजित केले आहे.या क्रार्यक्रमास मधूगिरीजी महाराज,माधवगिरीजी महाराज,रमेश गिरीजी महाराज,शिवभक्त भाऊ पाटील अशी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सोमवार दि 9 डिसेंबर रोजी उपस्थित भाविक भक्तांना आमटी भाकरीचा महाप्रसाद वाटण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मोहनराव चव्हाण यांनी शेवटी केले आहे.