जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

शहीद जवान पत्नीस माध्यमिक शिक्षक बँकेच्या वतीने 51 हजारांचा धनादेश सुपूर्त

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीतील शहिद जवान स्व.सुनिल वलटे यांची वीरपत्नी मंगल सुनिल वलटे यांना अहमदनगर माध्यमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या वतीने 51 हजार रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्त करण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील जवान सुनील वलटे यांचे अतिरेक्यांशी लढताना वीर मरण आले होते त्यांच्यावर 24 ऑक्टोबर रोजी त्यांच्याच गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.या घटनेने नगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत होती.आता त्यांच्या कुटुंबास सावरण्यास अनेक हात पुढे सरसावले आहे.अहमदनगर माध्यमिक शिक्षक सहकारी बँकेने त्याची दखल घेत या कुटुंबास मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील जवान सुनील वलटे यांचे अतिरेक्यांशी लढताना वीर मरण आले होते त्यांच्यावर 24 ऑक्टोबर रोजी त्यांच्याच गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.या घटनेने नगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत होती.आता त्यांच्या कुटुंबास सावरण्यास अनेक हात पुढे सरसावले आहे.अहमदनगर माध्यमिक शिक्षक सहकारी बँकेने त्याची दखल घेत या कुटुंबास मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.या वेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हि मदत जाहीर केली आहे.

सदर प्रसंगी वेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुर्यकांत डावखर,वाल्मिक बोठे, कोपरगाव तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजीराव लावरे ,श्रीरामपूर तालुक्यातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विलासराव शिंदे ,जाकीर सर व कोपरगाव तालुक्यातील श्री.तुपसैंदर सर,मुख्याध्यापक श्री.केरे सर,श्री.उसरे सर तसेच राहाता तालुक्यातील मुख्याध्यापक रंगनाथ गायकवाड सर, राजेंद्र जाधव,मच्छिंद्र गाडेकर ,विलास काकडे ,बाबासाहेब वाघे ,मिननाथ रजपूत , तसेच.कोपरगाव तालुक्यातील शिक्षक श्री.शेळके ,श्री.भोकरे सर, भागवत सर,कोताडे सर,राजगुरू सर,मलिक सर,दिवाण सर,बरगे सर,पाटील सर,चव्हाण सर,सातपुते सर,गागरे सर,केने सर,देशमुख सर,काकडे सर,सातपुते भाऊसाहेब सुभाष चन्ने,दिलीप देवकर ,वाल्मिक काकडे ,सुदाम आधुडे व कोपरगाव शाखेचे शाखाप्रमुख,नितीन होन, सागर सातपुते.आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close