जाहिरात-9423439946
खेळजगत

समताच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे नाव देशात मोठे करावे-खा.सदाशिव लोखंडे

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटपटू झहीर खान व संगमनेर येथील अजिंक्य रहाणे यांनीं जसे जिल्ह्याचे नाव देशात उज्वल केले तद्वतच समता इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव देशात अजरामर करावे असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोकमठाण येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

एरोबिक्स म्हणजे काय ?-सोप्या शब्दात एरोबिक्स म्हणजे ‘ऑक्सिजनच्या सान्निध्यात’ किंवा ‘ऑक्सिजन बरोबर’. एरोबिक व्यायाम म्हणजे असा व्यायामप्रकार ज्यामध्ये तुमच्या हृदयाची गती वाढते, श्वासोच्छ्श्वासाचा वेग वाढतो आणि जो वेग तुम्ही कमीत कमी २० मिनिटं टिकवू शकता.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील समता इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशीप -2019 स्पर्धांचे उदघाटन नुकतेच शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ. आशुतोष काळे हे होते.

सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संतोष नायर,श्री रविदत्त, शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर,समताचे संचालक जितेंद्र शहा,अरविंद पटेल,रांची येथील प्रेमप्रकाश तिवारी,आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने पालक विद्यार्थी,व दुबईसह देशातील विविध राज्यातील सुमारे अठरा संघ व त्यांचे खेळाडू उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, देशातील तरुणांची शक्ती विलक्षण रित्या वाढली आहे त्यांना विधायक शक्तीत रूपांतरित करण्यासाठी खेळासारखा अन्य पर्याय नाही.खेळामुळे विविध प्राविण्य मिळावण्याबरोबरच विविध पैलू विकसित होऊन खेळाडूंची सहनशीलता वाढते ती उर्वरित आयुष्यात त्यांना विकासासाठी कामी येते.समता इंटरनॅशनल स्कूलने राष्ट्रीय पातळीवर हि स्पर्धा आयोजित करून आता देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.त्यातून या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊन समताचे नाव नक्कीच मोठे करतील असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

सदर प्रसंगी आ. आशुतोष काळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यांनी खेळाडूंना सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या प्राचार्या लिसा बर्धन यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचा विद्यार्थी शंतनू होन, समीक्षा रुणवाल,जान्हवी संचेती,यांनी केले.तर उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष संदीप कोयटे यांनी मानले.त्यावेळी महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडावे या साठी शाळेने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व मल्लखांबाचे आयोजन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close