नगर जिल्हा
सात नंबर फार्म भरून पाणी न देणारे कार्य सम्राट कोण हे ओळखा-काळेंचा आ. कोल्हेना टोला !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगावातून वाहणाऱ्या गोदावरीच्या पूर पाण्यातून मराठवाड्यातील जायकवाडी धरण शंभर टक्के भरूनही कोपरगाव तालुक्यातील कालवे कोरडेठाक राहिले व शेतकऱ्यांची उभी पिके जळून चालली असल्यामुळे कोपरगावचे खरे कार्यसम्राट कोण आहे हे तालुक्यातील जनतेने वेळीच ओळखावे असा भीमटोला कर्मवीर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आज दुपारी संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात आ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता लगावला आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आ. अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कोल्हे कारखान्याच्या सभेत गोंधळ !
दरम्यान संजीवनी सहकारी कारखान्याच्या सभेत माजी मंत्री कोल्हे यांनी आपल्या तिसरी आघाडी,काँग्रेस,शिवसेना असा राजकीय प्रवास करून आलेली जुन्या कार्यकर्त्याला व्यासपीठावर बोलावून घेतले व आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर (मासा गळाला लागेल या आशेने ) बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली असता,त्यांनी काळे-कोल्हे कारखान्यांनी एकाच दिवशी सभा घेण्याच्या कृतीला आक्षेप घेतला व नवीन नियमाप्रमाणे सभासद पाच विशेष सर्वसाधारण सभांना चुकला तर त्याचे सभासदत्व रद्द होऊ शकते.त्यामुळे काळे-कोल्हे यांचे बऱ्याच विषयांवर एकी होऊ शकते तर या विषयावर का होत नाही असा जाबसाल करून सभासदांना आपल्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप केला.त्यावर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आधी आपल्या कारखान्याची सभा जाहीर केली व नंतर काळेंनी ठेवली त्यात आपला दोष नसल्याचा बचाव केला मात्र तो सभासदांच्या पचनी पडला नाही त्यावर तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन,माजी जेष्ठ संचालक चंद्रशेखर कुलकर्णी ,जेष्ठ नेते छबुराव आव्हाड, संचालक कारभारी आगवन, बाळासाहेब कदम, नारायण मांजरे,अॅड. आर. टी. भवर,संचालक सचिन रोहमारे,सुनील शिंदे, संभाजी काळे, काकासाहेब जावळे,सर्व संचालक मंडळ, सर्व संस्थांचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य,सदस्य,नगरपालिकेचे नगरसेवक, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, सेक्रेटरी सुनील कोल्हे,कार्यालय अधीक्षक बाबा सय्यद, कारखान्याचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,गत वर्षी अभूतपूर्व दुष्काळ होता.तरीही पाणी जायकवाडीस गेले या वर्षी पाऊस चांगला झाला गोदावरीला मोठा पूर आला.जायकवाडी धरण पूर्ण भरले तरीही येथील लोकप्रतिनिधींच्या ना कर्तेपणामुळे पाणी सोडावे लागेल.रब्बीची आवर्तने मिळण्याची शक्यता दिसत नाही.येथील लोकप्रतिनिधी एकाच रस्त्याचे दोन बाजूने दोन उदघाटने करून कार्यसम्राट होऊ पाहत आहे.अशी कडवी टीका केली.
या वर्षी पाऊस चांगला झाला गोदावरीला मोठा पूर आला.जायकवाडी धरण पूर्ण भरले तरीही येथील लोकप्रतिनिधींच्या ना कर्तेपणामुळे पाणी सोडावे लागेल.रब्बीची आवर्तने मिळण्याची शक्यता दिसत नाही.येथील लोकप्रतिनिधी एकाच रस्त्याचे दोन बाजूने उदघाटने करून कार्यसम्राट होऊ पाहत आहे.अशी कडवी टीका केली.
गोदावरी नदीला तीन ऑगष्ट रोजी मोठा पूर येऊन गेला त्यामुळे कोल्हापूर पद्धतीच्या संलग्न जमिनीचे मोठे नुकसान झाले रस्ते वाहून गेले.त्यामुळे ज्यांनी त्या लगत जमिनी घेतल्या त्यांचे जास्त नुकसान झाले आहे.त्याकडे पाहावयास कोणालाही वेळ नाही.यावर्षी साखर कारखाने तीन महिने चालतात की नाही शंका आहे.
कारखान्याच्या गळीत हंगामाबद्दल बोलताना ते म्हणाले की,मागील वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात १०२ सहकारी व ९३ खाजगी असे ११५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. राज्यामध्ये ९५२.११ लाख मे.टन ऊसाचे गाळप होऊन १०७.२१ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा हा ११.२६ राहिला आहे. २०१८-१९ च्या १६४ दिवसांच्या गाळप हंगामात एकूण ६,३९,८१७ मे. टन ऊसाचे गाळप करून ६,९८,६७० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.९२ राहिला असल्याचे सांगितले.
यावेळी विषय पत्रिकेवरील विषय वाचून मंजूर करण्याऐवजी नियोजित पढीक पद्धतीने मंजूर करण्यात आल्याचे जाणवले.अपवाद फक्त जेष्ठ सभासद मुक्ता पाटील पानगव्हाने यांचा होता त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला व ठिबक सिंचनला प्रतिटन शंभर रुपयांचे अनुदान देण्याऐवजी सरसकट सर्व ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली ते बोलत असताना काही व्यक्ति पूजक सभासदांनी त्यांच्या रास्त बोलण्यास हरकत घेतली असता त्यांनी त्याचा जोरात प्रतिवाद करून शेवटच्या क्षणी मग तुम्ही घ्या ( विद्यमान कारखान्याच्या अध्यक्षांचे नाव घेऊन )….बोकांडी असा आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला.
कर्मवीर कारखान्याने शेतकरी हितास प्रथम प्राधान्य देण्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मागील हंगामात जिल्ह्यात सर्वप्रथम २,३०० रुपये प्रथम हफ्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यापुढे जावून साखरेच्या दराचा व इतर कारखान्यांच्या ऊस दराचा विचार करून १५ दिवसातच हंगाम २०१८-१९ मध्ये एफ. आर. पी. ची रक्कम रुपये २,२६७. ७८ असतांना रुपये २३२.२२ जास्तीचा दर देवून सरसकट एकरकमी रुपये २,५०० दर देण्याचा निर्णय घेतला. आर्थिक नियोजन केल्यामुळे कामगारांचे कोणतेही पगार थकीत नाही, दरवर्षीप्रमाणे कारखान्यास ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी सभासदांना दिली.कारखान्यास चालू आर्थिक वर्षात एकूण ४ कोटी ९७ लाख रुपये नफा झाला आहे. कारखान्याचे नक्त मूल्य हे अधिक मध्ये आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन त्यांनी उपस्थित सभासद शेतकऱ्यांना केले. यावेळी टाळ्यांच्या गजरात विषय पत्रिकेतील १ ते १३ विषय मंजूर करण्यात आले. अहवाल वाचन सेक्रेटरी सुनील कोल्हे यांनी केले. सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले तर आभार संचालक बाळासाहेब बारहाते यांनी मानले.
यावेळी विक्रमी ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.यामध्ये आडसाली – विष्णू दगडू शिंदे, भरतपूर, पूर्व हंगामी – महावीर बन्सीलाल सेठी, सुरेगाव, सुरु – श्रीमती मथुराबाई मोतीगीर गोसावी, ब्राम्हणवाडा, खोडवा – दिलीप सूर्यभान गोरे वेळापूर या शेतक-यांचा समावेश होता.