गुन्हे विषयक
रस्त्यात अडवून जोडप्यास लुटले,गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा उच्छाद कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाही काल रात्री ११ वाजेच्या सुमारास एक जोडपे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना दोन दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या अज्ञात चौघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले असून बायकोच्या अंगावरील दागिन्यांसह ४५ हजार ६०० रुपयांची लूट केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात समतानगर,कोपरगाव येथील फिर्यादी संदीप रामदास बोळींज (वय-४५)यांनी दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

चार चोरट्यांनी त्यांच्याकडील असलेल्या कोयत्याचा धाक दाखवून सदर महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले आहे.त्यात १५ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र,१२ हजार ५०० रुपयांचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल,७ हजार ५०० रुपये किमतीचे दीड ग्रॅम वजनाचे कर्णफुले,तेवढ्याच किमतीचे आणखी कर्णफुले याशिवाय ०४ हजार रुपये किमतीचा ‘रेड मी’ मोबाईल त्यात एअरटेल कंपनीचे कार्ड (क्रं.९४०४ ३२ २३६७) असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज ओरबाडून धूम ठोकली आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात विविध गुन्हे वाढत असल्याचे वारंवार उघड होत आहे.शहरात तर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.अवैध व्यवसायात तर राजकिय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामील असल्याचे दिसून येत असल्याची शहर आणि तालुक्यात जोरदार चर्चा आहे.त्यामुळे कारवाई कशी करायची असा सवाल पोलिस अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पडला असल्यास नवल नाही.आता हे कमी की काय रस्ता लुटीच्या घटना समोर येऊ लागल्या असून अशीच एक घटना काल म्हणजेच दिनाक ०६ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.
यातील फिर्यादी इसम संदीप बोळींज व त्यांची पत्नी हे आपल्या दुचाकी वरून वैजापूरवरून कोपरगावच्या दिशेनं येत असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून उक्कडगाव तीळवणी यांच्या मध्ये असलेल्या उपबाजार समितीचे जवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवून त्यांच्याकडील असलेल्या कोयत्याचा धाक दाखवून सदर महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले आहे.त्यात १५ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र,१२ हजार ५०० रुपयांचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल,७ हजार ५०० रुपये किमतीचे दीड ग्रॅम वजनाचे कर्णफुले,तेवढ्याच किमतीचे आणखी कर्णफुले याशिवाय ०४ हजार रुपये किमतीचा ‘रेड मी’ मोबाईल त्यात एअरटेल कंपनीचे कार्ड (क्रं.९४०४ ३२ २३६७) असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज ओरबाडून धूम ठोकली आहे.
त्यानंतर त्यानी गावाचा आधार करून दुसऱ्या दिवशी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आदींनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१४०/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम ३०९(४),३(५) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत.