नगर जिल्हा
पालकमंत्री शिंदे यांचे हस्ते आत्मा मालिकच्या विद्यार्थ्याचा सत्कार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलातील विजय गोर्डे, शुभम नलावडे या वि़द्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून ७३ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पोलीस परेड मैदानावरील कार्यंक्रमात त्यांना जिल्हाचे पालकामंत्री मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी जिल्हयातील विषेश प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्याचे सत्कार करण्यात आले. यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधिक्षक ईशू सिंधू, जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनी विखे, उपाध्यक्ष जयश्री घुले, ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश गिरमे, प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सागर अहिरे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे, विषय शिक्षक राहुल जाधव, अनिता कोल्हे, किशोर बडाख, गणेश रासने, रविंद्र धावडे, सचिन डांगे हे उपस्थित होते.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली, आत्मा ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, माधवराव देशमुख, व्यवस्थापक हिरामण कोल्हे यांनी अभिनंदन केले.