गुन्हे विषयक
विवाहितेवर अत्याचार,आरोपी विरुध्द गुन्हा

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी सासर असलेल्या व दुसऱ्या तालुक्यात माहेर असलेल्या विवाहित महिलेवर (वय-२९) ती आपल्या माहेरी गेलेली असताना व सासरी असताना आरोपीने (वय-३२)तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तीच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी सदर महीलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला ही आपल्या सासरी असताना आरोपीने आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन आपल्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देऊन दिनाक १० एप्रिल रोजी रात्री ११.३० ते दिनांक ०२ मे २०२५ रोजी रात्री ०१ वाजता आपल्यावर शारीरिक अत्याचार केला असल्याचे म्हंटले आहे.
देशात महिलांवरील अत्याचार कमी करण्यास सरकारने विविध कठोर कायदे केलेले असताना त्या अत्याचारात कमी येताना दिसत नाही परिणामी आजही महिला पुरुषी अत्याचाराला बळी पडताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.फिर्यादी महीलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण व अत्याचार करणारा आरोपी हे एकाच गल्लीत राहत असून आपले माहेर बाहेर तालुक्यात आहे.आपण आपल्या सासरी असताना आरोपीने आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन आपल्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देऊन दिनाक १० एप्रिल रोजी रात्री ११.३० ते दिनांक ०२ मे २०२५ रोजी रात्री ०१ वाजता आपल्यावर शारीरिक अत्याचार केले आहे.एवढेच नाही तर आपल्या माहेरी गेलेली असतानाही त्या ठिकाणी येऊन आपल्याला त्रास दिला असल्याचे म्हटले आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी यातील फिर्यादी महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२३२/२०२५ भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम ६४(२),(एम)३५१(२) प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचेसह पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे,भूषण हांडोरे यांनी भेट दिली आहे.तर पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोठे हे करीत आहेत.