जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

निष्ठावंत कार्यकर्त्यास कोपरगावची अधिकृत उमेदवारी मिळावी-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव (प्रतिनिधी )

आगामी कोपरगाव विधानसभा निवडणुकीत भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यासच विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी अशी महत्वपुर्ण मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे आज सकाळी अकराच्या सुमारास शिर्डी विमानतळावर समक्ष भेटून केली आहे.या निमित्ताने मतदार संघात पाच वर्षात झालेल्या कामाचा आढावा दिला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज सकाळी लोणी,पाथर्डीसह नगर जिल्हा दौरा होता त्या साठी काल अकराच्या सुमारास त्यांचे काकडी विमानतळावर आगमन झाले त्यांचे कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी स्वागत केले त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.

कोपरगाव विधानसभा निवडणुकीत मागील वेळी अचानक उमेदवारी देताना भाजप नेत्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले होते.मात्र तरीही निष्ठावान कार्यकर्त्यानी आयात उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचे इमाने इतबारे काम करून त्यांना निवडणून आणले होते.मात्र पाच वर्षात या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय तर मिळाला नाहीच उलट पक्षाची मोठी हानी झाली आहे.

निष्ठावान कार्यकर्त्यानी आयात उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचे इमाने इतबारे काम करून त्यांना निवडणून आणले होते.मात्र पाच वर्षात या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय तर मिळाला नाहीच उलट पक्षाची मोठी हानी झाली आहे.

गत पाच वर्षात केंद्रात व राज्यात एकछत्री सत्ता असतानाही व कार्यकर्ते असतानाही तालुक्यात एकही शाखा उघडण्यात आली नाही.अन्य दुय्यम पदावरही कोल्हे गटाने आपले घरातील व्यक्तींनाच प्राधान्य दिले.त्यात साई संस्थान असो किंवा अन्य पदे असो .त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांत अच्छा-खांसा राग आहे.विविध कार्यक्रमात वापरण्यात येणाऱ्या फलकावर पक्षाचे चिन्ह गायब झालेले पाहायला मिळाले.नोव्हेम्बर २०१६ कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीतही या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले व आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देऊन त्यांचीच पाठ मऊ करण्याचे काम सत्ताधारी गटाने केले.त्यामुळे जनतेतही त्या घटनेचा राग होता व तो पुढील संपन्न झालेल्या निवडणुकीत दिसून आला.व कोपरगाव शहरातील मतदारांनी मोदी मंचचे उमेदवार विजय वहाडणे याना प्रचंड मतांनी निवडुन दिले.एवढेच नाही तर मार्च २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतही कोपरगाव पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या पाचही जागा राष्ट्रवादीने मिळवल्या पंचायत समितीत केवळ शिंगणापूर व पोहेगाव गटाचा अपवाद होता.असे असतानाही कोपरगाव तालुक्यात केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असताना ज्या वेगाने विकास व्हावयास हवा होता तो झाला नाही.

नोव्हेम्बर २०१६ कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीतही या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले व आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देऊन त्यांचीच पाठ मऊ करण्याचे काम सत्ताधारी गटाने केले.

रस्त्यावर खड्डे मावत नाही.नगर-मनमाड टाकळी फाटा ते टाकळीच्या मध्यावर हा रस्ता व साईबाबा कॉर्नर ते संजीवनी कारखान्याचा अपवाद सोडला तर पाचही वर्षात रस्त्यांचा निधी कोठे गायब झाला हे कोणालाही कळायला मार्ग नाही.आय.टि. आय.कॉलेजची इमारत पाच वर्षा पूर्वी होती तशीच आजही अर्धवट आहे.उलट ती काटेरी झाडांनी वेढली गेली हा पाच वर्षात झालेला विकास.धारणगावसह सहा गावांची पाणी पुरवठा योजना भाजप-शिवसेना युतीचे सरकार पुन्हा राज्यात येऊनही पूर्ण झाली नाही.

तीच रांजणगाव देशमुखसह सहा गावांची पाणी योजना चोवीस वर्षा नंतरही जैसे-थेच आहे.आघाडी सरकारात असताना ज्यांनी विरोध केला ते भाजप मध्ये येऊनही त्यांची युती सरकारच्या योजना बाबत दृष्टी बदललेली दिसली नाही.

मार्च २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतही कोपरगाव पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या पाचही जागा राष्ट्रवादीने मिळवल्या पंचायत समितीत केवळ शिंगणापूर व पोहेगाव गटाचा अपवाद होता.

त्यामुळे त्या योजना तशाच धूळखात पडल्या एवढेच कशाला तत्कालीन शिवसेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी कोपरगाव ,संगमनेर,शिर्डी,संगमनेर आदी चार शहरांसाठी भूमिगत विद्युत वाहिन्या मंजूर केल्या होत्या त्या अद्याप सहा वर्षे उलटूनही पूर्ण करता आल्या नाही.कासली गावची पाणी पुरवठा योजना गत तीस वर्षांपासून तशीच सडुन चालली आहे.शेती पाण्याची बाब तर विचारूच नका.एकशे दोन टी. एम.सी.चे जायकवाडी धरण गोदावरी नदीतून व तिच्या उपनद्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याने काठोकाठ भरले पण कोपरगाव राहाता तालुक्यांना शेती सिंचनाचे पाणी पुरवणारे डावा व उजवा हे कालवे कोरडेठाक राहिले.त्यांचे पाणी नाशिक जिल्ह्यातील अवजड उद्योगांना व महापालिकांना वाटून दिले.गोदावरी व तिच्या काठची भूजल पातळी वाढण्यासाठी त्याचा गोदाकाठच्या शेतीला व शेतकऱ्यांना फायदा करून देण्याऐवजी गोदावरीला या नेत्यांनी वाळू उपसा करण्यास प्रतिबंध करणे अपेक्षित असताना लोकनेत्यांनी व त्यांच्या युवराजाचे नाव वाळू ठेक्यात घेण्यात आले या परिस तालुक्याचे दुसरे दुर्दैव काय असू शकते.

एकशे दोन टी. एम.सी.चे जायकवाडी धरण गोदावरी नदीतून व तिच्या उपनद्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याने या वर्षी काठोकाठ भरले पण कोपरगाव राहाता तालुक्यांना शेती सिंचनाचे पाणी पुरवणारे डावा व उजवा हे कालवे कोरडेठाक राहिले.त्यांचे पाणी नाशिक जिल्ह्यातील अवजड उद्योगांना व महापालिकांना वाटून दिले.

या मुळे नदी काठची व गोदावरी कालव्यांखालील शेतीची पार रया गेली असून शेतकरी कर्जा खाली दबला गेला आहे.तो आता आत्महत्या करू लागला आहे.तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गातून इतर शेतकऱ्यांसारखे साठवण तलाव होऊन कोपरगाव शहराचा पाच क्रमांकाचा साठवण तलाव होऊन शहरातील जनतेचे कोटकल्याण होईल असे वाटत असताना येथील लोकप्रतिनिधींना ठेकेदारांचे कल्याण करण्याची उबळ आली व त्यांनी ठेकेदारास एवढी लांबून वाहतूक परवडणार नाही अशी न्याय (?) भूमिका घेऊन आपण कोपरगाव शहरातील मतदारांचे हितचिंतक आहे की ठेकेदारांचे हे दाखवून दिले आहे. तीच बोंब साठवण तलावातील पाण्याची. या तळ्यातील पाणी जलसंपदा विभागाच्या लेखी म्हणण्यानुसार दररोज देऊनही ८० ते ९० दिवस पुरणे आवश्यक असताना ते आठ ते पंधरा दिवसाला देऊनही ते पुरत नाही यावर आपण शोध घेतला असता या पाण्याला कोठे पाय फुटतात हे अध्यक्ष म्हणून आपण दाखवून दिल्याने पाण्यापासून कोपरगावच्या जनतेला कोण वंचित ठेवते ते उघड झाले असताना हि भाजपने अशा कामाच्या लोकप्रतिनिधींना पुन्हा उमेदवारी दिल्यास परिणाम काय होणार हे सांगण्यासाठी कोंणा ज्योतिषाची गरज नाही.

जलसंपदा विभागाच्या लेखी म्हणण्यानुसार कोपरगावला दररोज देऊनही ८० ते ९० दिवस पुरणे आवश्यक असताना ते आठ ते पंधरा दिवसाला देऊनही ते पुरत नाही यावर आपण शोध घेतला असता या पाण्याला कोठे पाय फुटतात हे अध्यक्ष म्हणून आपण दाखवून दिल्याने पाण्यापासून कोपरगावच्या जनतेला कोण वंचित ठेवते ते उघड झाले.

कोपरगाव तालुक्याचा पूर्व भाग व नैऋत्येकडील दुष्काळी गावे स्वातंत्र्यानंतर बहात्तर वर्षानंतरही कोरडी ठाक आहेत.रांजणगाव सह तेरा गावे व अन्य तालुक्यातील सर्व मिळून १८२ गावांसाठी निळवंडे प्रकल्प शासनाने मंजूर केला मात्र या नेत्यांच्या तीन पिढ्या राजकारणात खपुनही यांनी हा प्रकल्प पूर्ण केला नाहीच पण त्यास खोडा घालण्याची एकही संधी सोडली नाही.निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयाचे दरवाजे खटखटावून विधिज्ञ अजित काळे यांच्या मार्फत न्यायिक मार्गाने या प्रकल्पाच्या कालव्यांचे काम सुरु केले तर या मंडळींनी सदरचे पाणी आपल्या अल्कोहोलिक कारखान्याना पळविण्याचे डाव आखून दुष्काळी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकविण्यासाठी रात्रीचा दिवस चालवला आहे.यातून हि मंडळी कोणाचे कोटकल्याण करणार हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

रांजणगाव सह तेरा गावे व सात तालुक्यातील मिळून १८२ गावांसाठी निळवंडे प्रकल्प शासनाने मंजूर केला मात्र या नेत्यांच्या तीन पिढ्या राजकारणात खपुनही यांनी हा प्रकल्प पूर्ण केला नाहीच पण त्यास खोडा घालण्याची एकही संधी सोडली नाही.

कृती समितीच्या आरोपात कोणाही सुज्ञास तथ्यांश वाटल्याशिवाय राहत नाही.अशा परिस्थितीत वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी देताना ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले त्यांचाच विचार करावा असे वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.या बाबत आपण राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना अवगत केले असून ते या वेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देतील असा आशावाद व्यक्त केला असून चार व पाच क्रमांकाच्या साठवण तलावाला तातडीने निधी देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close