जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी, कोपरगावात पाच जणांवर गुन्हा दाखल!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सासरी नांदत असलेल्या आपल्या मुलीला मोटारसायकलसाठी माहेरवरून वीस हजार रुपये आणावे या साठी सातत्याने शारीरिक,मानसिक छळ करून तिला नवरा सागर शिवाजी गांगुर्डे,सासू लता शिवाजी गांगुर्डे,सासरा शिवाजी गांगुर्डे,लता गांगुर्डे हीच दुसरा नवरा गौतम घोडेराव,सर्व रा.कोळपेवाडी,नणंद प्रियांका साळुंके रा.पिंपळदरी ता.अकोले या पाच जणांनी ऊवा मारण्याचे औषध घेऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला तथा मयत मुलीची आई हि अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी असून त्यांचा नवरा गतवर्षी कॅन्सरने स्वर्गवासी झाले आहे.त्या पिंपळदरी येथे आपला मुलगा,सून नातवंडे आदी समवेत राहतात.त्यांना दोन मुली असून त्या दोन्ही विवाहित आहे .पैकी एक डाऊच येथे दिलेली आहे तर दुसरी मयत मुलगी कविता हिचे लग्न कोळपेवाडी येथील सागर गांगुर्डे याचे बरोबर गत वर्षी लावून देण्यात आले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळींनी कविता गांगुर्डे हिला माहेराहून मोटारसायकल घेण्यासाठी व हप्ता भरण्यासाठी वीस हजार रुपये आणावे अशी मागणी सुरु केली.तथापि आपले पती जिवंत असताना त्यांनी या मुलीच्या सासरच्या मंडळींना काही रकमा दिल्याही होत्या मात्र आपला नवरा गत वर्षी वारल्या नंतर मात्र माहेराहून पैसे आणणे शक्य नसल्याने आपल्या मयत मुलीला मारहाण सुरु झाली तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येऊ लागला.आपल्या मयत मुलीने सासरचे नवरा,सासू,सासरा यांना समजावून पाहिले मात्र त्यांना काहीही फरक पडला नाही.त्यांनी तिला आणखी त्रास देणे सुरु केले.ती सण, उत्सव यासाठी माहेरी येत त्यावेळी तिने या सर्व तक्रारी आपल्याला सांगितल्या होत्या.त्यावर आपण सासरच्या मंडळींना समजावून सांगूनही उपयोग झाला नाही. तरीही तिला हा सर्व त्रास सुरुच राहिला अखेर या सर्व त्रासाला कंटाळून तिने गुरुवार दि.२२ ऑगष्ट रोजी दुपारी राहते घरी उवा मारण्याचे औषध पिऊन घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.त्या नंतर तिला कोकमठाण येथे आत्मा मलिक हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असताना तिची प्राणज्योत मालवली असून या घटनेला सासरची वरील पाच मंडळी कारणीभूत असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.११६ /२०१९,भा.द.वि.कलम.३०६,४९८,(अ),३२३,५०४,५०६,३४ अन्वये वरील सागर गांगुर्डे,व त्या मयत महिलेचे सासू,सासरे,सासूचा दुसरा नवरा व नणंद या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सचिन इंगळे हे करीत आहेत.दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सासरच्या मंडळी विरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close