नगर जिल्हा
दाभोलकरांच्या खुन्याना शिक्षा द्या-कोपरगावात मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. स्व. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला त ६ वर्षाचा कालखंड उलटूनही त्यांच्या खुन्याना अद्यापही शिक्षा न झाल्याने राज्यात संतापाचे वातावरण असून या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब या आरोपींना शिक्षा करावी अशी महत्वपूर्ण मागणी नगर जिल्हा राष्ट्रवादी सेवादलाचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम पगारे यांनी कोपरगावात नुकतीच केली आहे.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती.त्या त्यानंतर या घटनेचा देशात व राज्यात नागरिकांनी जोरदार निषेध केला होता.व दाभोळकर यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती.त्या साठी राज्यभर अनेक वर्षांपासून आंदोलने होत आहे.तरीही संवेदनशून्य सरकार त्यावर आरोपींचा शोध घेऊ शकलेले नाही.या उलट तपासाची दिशा भरकटविण्याचे काम विविध तपास यंत्रणा करत आहे ही बाब पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला शोभणारी नाही.त्यामुळे या घटनेचा सर्वत्र धिक्कार करण्यात येत आहे.नुकतेच या हत्येला सहा वर्षे पूर्ण झाले त्या बद्दल कोपरगावात कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना राष्ट्र सेवादलाचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बाबत आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन या हत्येतील आरोपीना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.शासनाने यात लक्ष घालून गुन्हेगारांना जास्तीत शिक्षा होईल असे पहावे असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष पुरूषोत्तम पगारे यांनी केले.ते स्व.डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या ६ व्या स्मृती दिन प्रसंगी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देतांना तहसिलदार कार्यालयात बोलत होते. न्यायालयात खटला चालू असल्याने जादा न बोलता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणारे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. तहसिलदार श्री चंद्रे यांनी या बाबत त्वरीत हे निवेदन मुख्यमंत्री यांच्या कडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात धर्माच्या नावाने सुरु असणाऱ्या चमत्कार, बुवाबाजी, फसवणूक, दिशाभूल, मानसिक गुलामगिरी आणि विविध प्रकारच्या शोषणापासून समाजाला परावृत्त करणारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला ६ वर्ष पूर्ण होत असून खुनाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई होत असल्याचा आरोप केला आहे.
या बाबतीत महाराष्ट्र शासनाने यात लक्ष घालावे व गुन्हेगारांना शासन होईल या द्दष्टीने प्रयत्न करावे.विविध तपास यंत्रणांना ‘राजकीय इच्छा शक्तीचा अभाव’ असल्यामुळे या चौकशीत अपयश आले असल्याचा आरोप पगारे यांनी केला आहे. राज्यकर्त्यांना व प्रशासनाला प्रश्न विचारण्याचा आणि तपास यंत्रणेच्या धीम्या कारभाराबद्दल सनदशीर मार्गाने निषेध नोंदवण्याचा संवैधानिक अधिकार प्रत्येक नागरिकास असून या बाबत जाणीवपूर्वक लक्ष घालून डॉ.दाभोलकरांच्या हत्येला जबाबदार असलेल्या सर्वांना अटक होऊन त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा व्हावी.
या प्रसंगी राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यासह पुरोगामी विचाराचे अभिजीत पगारे, श्रीम. रजिया शेख, क्राँ. एल. एम. डांगे, नारायण डुकरे, रमेश टिक्कल, वैशाली दिवेकर, अंजलीताई राहातेकर,ज्योत्स्ना पगारे, कु.आश्विनी पाटील, कु. तेजल पगारे, अन्सार सय्यद आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसिलदार योगेश चंद्रे यांनी आंदोलन कर्त्यांच्या भावना सरकारला कळविण्याचे आश्वासन दिले आहे.