जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

रस्ता अडवून महिलेची छेडछाड, गुन्हा दाखल,आरोपी कोण?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील कोपरगाव नजीक असलेल्या जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी घरकाम करणारी पस्तीस वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणारा मुखेड ता.मुखेड ह.मु.अन्नपूर्णानगर कोपरगाव येथील आरोपी अविनाश ज्ञानदेव आहेर (वय-३२)याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नजीक जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेली मात्र कोपरगाव बुसस्थानक परिसरातील एका कापड दुकानात काम करून आपली तीन मुले,आई यांचा उदरनिर्वाह करणारी महिला रोज आपल्या कामावर जाऊन-येऊन करते.मात्र तिला मंगळवार दि.२० ऑगष्ट रोजी विचित्र अनुभव आला ती दुपारी साडेतीनच्या सुमारास आपल्या घरी जात असताना एक अनोळखी इसम आपल्या होंडा शाईन या दुचाकीवर (दुचाकी क्रं.एम.एच.१५ एफ.एक्स.-८२८६) तिच्या जवळ येऊन थांबला व त्याने तिला आपल्या गाडीवर बसण्याचा आग्रह धरू लागला सदर महिलेने तो अनोळखी असल्याने त्याचे बरोबर जाण्यास नकार दिला असता त्याने दमबाजी करण्यास प्रारंभ केला असता सदर महिलेने आपल्या काम करत असलेल्या बस स्थानकाजवळील कापड दुकानात धाव घेऊन आपल्या अन्य मैत्रिणी व कापड दुकानदारास हि बाब लक्षात आणून दिली व त्यांनी त्यास पकडले व त्यास असे वाईट न वागण्याची समज दिली व त्याने सर्वांची माफी मागितल्यावर त्यास सोडून देण्यात आले.

दरम्यान या प्रकाराने महिला घाबरून गेली आहे.अशा आरोपीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.

मात्र त्याने दुसऱ्या दिवशीही आपण सकाळी दहाच्या सुमारास कामावर जात असताना तोच प्रकार करून आपला सदिच्छा पदर ओढून अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्यामुळे सदरची अपद्ग्रस्त महिला भीतीने व्याकुळ झाली व तीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सदरचा आरोपी अविनाश आहेर याचे विरुद्ध भा.द.वी.कलम ३५४,३८१,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मान गावकर यांचे मर्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेंद्र पुंड हे करीत आहेत.
दरम्यान या प्रकाराने महिला घाबरून गेली आहे.अशा आरोपीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close