
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मिळालेल्या खबरीनुसार पांढर्या रंगाची कार येताच पोलीस सावध झाले.मात्र पुढे पोलीस असल्याचा संशय या गुन्हेगारांना आला व त्यांनी गाडीचा वेग कमी केला.त्यावेळी मागे बसलेला एकजण दरवाजा ऊघडून पळून गेला.तर चार जण जेरबंद केले आहे.
याबाबत श्रीरामपुर शहर पोलीसांनी शुक्रवारी प्रसीद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांना वरील गुप्त माहीती मिळाल्यानंतर त्यांचेसह सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील,संभाजी पाटील,दत्तात्रय ऊजे,संतोष बहाकर,तपास पथकाचे जालींदर लोंढे,पंकज गोसावी,अर्जुन पोकळे,सुनिल दिघे,किशोर जाधव,महेंद्र पवार,गणेश गावडे,रघुवीर कारखले,राजु महेर आदींच्या पथकाने खंडाळा परीसरातील एस.टी.कार्यशाळेजवळ सापळा लावला.गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मिळालेल्या खबरीनुसार पांढर्या रंगाची कार येताच पोलीस सावध झाले.मात्र पुढे पोलीस असल्याचा संशय या गुन्हेगारांना आला व त्यांनी गाडीचा वेग कमी केला.त्यावेळी मागे बसलेला एकजण दरवाजा ऊघडून पळून गेला.मात्र गाडीतील विक्रम उर्फ विकी नारायणसिंग परदेशी (वय-३०) वर्षे,प्रसाद भाऊसाहेब वदक (वय-२४) वर्षे,प्रशांत साईनाथ लेकुरवाळे (वय-२५) वर्षे,सागर आप्पासाहेब दुशींग (वय-३०) वर्षे,सर्व रा.निमगाव खैरी यांना ताब्यात घेतले तर भक्ती काळे हा पळून जाण्यास यशस्वी झाला आहे.