नगर जिल्हा
धार्मिक स्थळे खुली करा-..या माजी मंत्र्यांची मागणी

जनशक्ती न्यूजसेवा
राहुरी-(प्रतिनिधी)
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व धर्मिक मंदिरे खुली करण्यासाठी राहुरी मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
कोरोनाच्या नावाखाली कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे सरकारने बंद ठेऊन वारकरी संप्रदायासह भाविकांची चेष्टा करण्याचे काम केले.मठ-मंदिरे बंद असल्याने लहान सहान उद्योजकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. सरकार हे राज्य टाळेबंदी करण्याची भाषा करत असताना मग मंदिरे जाणीवपूर्वक बंद ठेवण्याचे काम करून राजकारण करित आहे-माजी मंत्री कर्डीले
देशभरात कोरोना विषाणूने टाळेबंदी जाहीर करून आता पाच महिन्याचा कालावधी उलटला आहे.त्यामुळे धार्मिक ठिकाणे पर्यटन आदी ठिकाणचे अर्थचक्र कोलमडले आहे.रोजगार हिरावला आहे.अनेकांना हातातोंडाची गाठ पडणे अवघड बनले आहे.त्यामुळे राज्यातील भाजपने घंटा नाद करण्याचे आंदोलन केले आहे.राहुरी शहरातही माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी आंदोलन केले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,”कोरोनाच्या नावाखाली कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे सरकारने बंद ठेऊन वारकरी संप्रदायासह भाविकांची चेष्टा करण्याचे काम केले.मठ-मंदिरे बंद असल्याने लहान सहान उद्योजकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. सरकार हे राज्य टाळेबंदी करण्याची भाषा करत असताना मग मंदिरे जाणीवपूर्वक बंद ठेवण्याचे काम करून राजकारण करित आहे.दारू दुकाने बिनबोभाट सुरु असताना मंदिरे का बंद केली आहे.याचे कारण समजायला मार्ग नाही.त्यामुळे झोपलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करुनही सर्व धर्मिक मंदिरे खुली होणार नसेल तर वारकरी व पक्षाचे कार्यकर्ते मिळुन गावोगावातील सर्व धार्मिक स्थळे खुली करु असा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषद चे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम,पक्षाचे प्रभारी जि.प.सदस्य अशोक खेडकर,तालुकाध्यक्ष अमोल भनगडे,युवा मोर्चा अध्यक्ष रविंद्र म्हसे,तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस,संचालक सुरसिंग पवार,सुभाष गायकवाड आदी मान्यवरांनीं उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
यावेळी घंटानाद आंदोलन प्रसंगी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष नामदेव कांबळे, उत्तमराव म्हसे,नानासाहेब गागरे,शहाजी जाधव ठाकुर,आण्णासाहेब शेटे,योगेश गिते,राजेंद्र गोपाळे, प्रभाकर हरिश्चंद्रे,सुरेश म्हसे,अफनान अत्तार तसेच वारकरी संप्रदायाचे भाविक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.