कोपरगाव तालुका
गोदावरीवरील..त्या बंधाऱ्याचे कठडे होणार दुरुस्त !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे संरक्षक कठडे तातडीने बांधून द्यावे व खराब झालेला रस्ता दुरुस्त करावा याबाबत आ.आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनमुश्रीफ यांच्याकडे केलेल्या मागणीची मंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी येवून या पुलाची पाहणी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे गोदावरी नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात आला असून या बंधाऱ्याचे बाजूचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे व अनेकवेळा पूल पाण्याखाली गेल्यामुळे या पुलावरील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण खराब झाल्यामुळे या पुलावरून नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत होती.या बंधाऱ्याचा पुणतांबा,डोणगाव,बाबतरा,वारी,कान्हेगाव,लाख,पुरणगाव आदी गावातील नागरिकांना मोठा उपयोग होत होता.मात्र बंधाऱ्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे या बंधाऱ्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे गोदावरी नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात आला असून या बंधाऱ्याचे बाजूचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे व अनेकवेळा पूल पाण्याखाली गेल्यामुळे या पुलावरील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण खराब झाल्यामुळे या पुलावरून नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत होती.या बंधाऱ्याचा पुणतांबा,डोणगाव,बाबतरा,वारी,कान्हेगाव,लाख,पुरणगाव आदी गावातील नागरिकांना मोठा उपयोग होत होता.मात्र बंधाऱ्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे या बंधाऱ्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते.भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये यासाठी बंधारा कृती समिती व पुणतांबा,डोणगाव,बाबतरा,वारी,कान्हेगाव,लाख,पुरणगाव आदी गावातील शेतकरी व नागरिकांनी या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी आ. काळे यांचेकडे मागणी केली होती.
बंधाऱ्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे या पुलावर अनेक छोटेमोठे अपघात होवून काही नागरिकांना आपला दोन नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता तर अनेक नागरिक जखमी झाले होते.कोपरगाव, राहाता व वैजापूर तालुक्यातील नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनमुश्रीफ यांच्या समवेत झालेल्या बैठकीत यांचेकडे आ.काळे यांनी लक्ष वेधले होते.त्याबाबत पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पाटबंधारेचे सहाय्यक अभियंता महेश गायकवाड,सिंचन शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी गुरुवार रोजी या बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी माजी सरपंच अॅड. मुरलीधर थोरात,शांतीलाल भाटी,बंधारा कृती समितीचे अध्यक्ष सुधाकर जाधव,उपाध्यक्ष भाऊसाहेब केरे,संजय धनवटे,सचिन धोर्डे,विलास पेटकर,रवींद्र जेजुरकर,अर्जुनराव वहाडणे,प्रभाकर डोखे,सुभाष धोर्डे,आदी मान्यवर उपस्थित होते.या बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत लवकरात लवकर अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार असून मंजुरी येताच या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार असल्याचे पाटबंधारेचे सहाय्यक अभियंता महेश गायकवाड,सिंचन शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी उपस्थितांना सांगितले
यावेळी माजी सरपंच अॅड. मुरलीधर थोरात,शांतीलाल भाटी,बंधारा कृती समितीचे अध्यक्ष सुधाकर जाधव,उपाध्यक्ष भाऊसाहेब केरे,संजय धनवटे,सचिन धोर्डे,विलास पेटकर,रवींद्र जेजुरकर,अर्जुनराव वहाडणे,प्रभाकर डोखे,सुभाष धोर्डे,आदी मान्यवर उपस्थित होते.या बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत लवकरात लवकर अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार असून मंजुरी येताच या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार असल्याचे पाटबंधारेचे सहाय्यक अभियंता महेश गायकवाड,सिंचन शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी उपस्थितांना सांगितले आहे.