नगर जिल्हा
वाळकीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील वाळकी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे विद्यमान सरपंच संध्याराणी शिरोळे यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आहे.
पंधरा ऑगष्ट हा स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स.१९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे.या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.वाळकीतही हा उत्सव साजरा करण्यात आला आहे.
पंधरा ऑगष्ट हा स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स.१९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे.या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण,मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.मात्र यावर्षी कोरोना साथीचा प्रभाव या सणावर पडला आहे.त्यामुळे लहान मुलांना या उत्सवापासून दूर ठेवण्यात आले आहे.त्याला वाळकी ग्रामपंचायतही अपवाद नाही.या वेळी मिरवणूक,प्रभात फेरी याला फाटा देण्यात आला आहे.
यावेळी पोलीस पाटील शामराव शिरोळे,उपसरपंच शबाना सादिक शेख,ग्रा.पं सदस्य शमदभाई शेख,विकास धिवर,युनुसभाई शेख,विनायक शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच माजी सरपंच गनिभाई शेख,गोरखनाथ शिरोळे,प्रकाश दिघे,रामनाथ दिघे,गोपीनाथ शिरोळे,भारत शिरोळे,मोसीन पठाण मुख्याध्यापक श्री सोनवणे सर व सर्व शिक्षक,ग्रामस्थ बहू संख्येने सुरक्षित अंतर राखून उपस्थित होते.