जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोनावरील औषधांचा लागला शोध !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

वॉशिंग्टन:

आधुनिक कॉम्प्युटर सिमुलेशनद्वारे शास्त्रज्ञांनी करोनाच्या आजारावर प्रभावी ठरणाऱ्या आणखी एका औषधाचा शोध लावला आहे. या औषधाचा वापर बायपोलर डिसऑर्डर (एक मानसिक आजार) आणि ऐकण्याची क्षमता कमी असणाऱ्या रुग्णांसाठी करण्यात येतो. हे औषध करोना विषाणूची प्रतिकृती (रेप्लकेशन) बनवण्यापासून रोखत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहे. रुग्णाच्या शरीरात विषाणू आपली संख्या वाढवत नेत आणि त्याचा परिणाम श्वसन क्षमतेवर होतो.

एका संशोधनानुसार, करोनाचा मुख्य प्रोटीज एम.पी.आर.ओ. हा अंझाइम व्हायरसच्या लाइफ सायकलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातील संशोधकांसह इतर संशोधकांनुसार,एम.पी.आर.ओ. व्हायरसला जेनेटिक मटेरियल (RNA)पासून प्रोटीन बनवण्याची क्षमता प्रदान करतो आणि त्यामुळेच व्हायरस मानवाच्या शरीरात आपली संख्या वाढवतो.

‘जर्नल सायन्स अॅडव्हासेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, करोनाचा मुख्य प्रोटीज एम.पी.आर.ओ. हा अंझाइम व्हायरसच्या लाइफ सायकलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातील संशोधकांसह इतर संशोधकांनुसार,एम.पी.आर.ओ. व्हायरसला जेनेटिक मटेरियल (RNA)पासून प्रोटीन बनवण्याची क्षमता प्रदान करतो आणि त्यामुळेच व्हायरस मानवाच्या शरीरात आपली संख्या वाढवतो. बायोलॉजिकल मोलिक्यूल्सच्या मॉडेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करत शास्त्रज्ञांनी करोनाविरोधात संभाव्य प्रभावी हजारो कंपाउंड्सचा शोध घेतला.एम.पी.आर.ओ. विरोधात प्रभावीपणे ईबलसेलन (Eblselen) हे औषध अधिक प्रभावी ठरेल असे शास्त्रज्ञांना आढळले. यामध्ये एका केमिकल कंपाउडमध्ये अॅण्टी व्हायरल,अॅण्टी इन्फ्लामेट्री,अॅण्टी ऑक्सिडेटिव्ह,बॅक्ट्रीसिडल आणि सेल प्रोटेटिव्ह क्षमता आहे.

संशोधनात डे पबलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एन्झाइम आणि औषधाचे विस्तृत मॉडेल्स बनवणे आणि सुपर कॉम्प्युटर सिम्युलेशनमध्ये त्यांना आढळले की, ईबलसेलन (Eblselen) हे औषध एम.पी.आर.ओ.ला अटकाव करू शकतो. या औषधामुळे करोनाबाधितांवर उपचार करता येणे शक्य होईल असा दावा करण्यात येत आहे. मात्र, त्यादृष्टीने अधिक संशोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, करोनाच्या आजारावर उपचार करण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञांना मोठे महत्त्वाचे यश मिळाले आहे. “कोव्हिड-१९’वर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक संभाव्य औषधे शोधून काढली आहेत. ‘मशिन लर्निंग’चा वापर करून ही औषधे शोधण्यात आली असून करोनावर ती प्रभावी ठरतील असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.या शास्त्रज्ञांच्या या पथका एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक आनंदशंकर रे यांनी सांगितले की,”आम्ही एका औषधाची निर्मिती केली. ‘ड्रग डिस्कव्हरी पाइपलाइन’ असा शब्दप्रयोग त्यांनी यासाठी वापरला. कम्प्युटरच्या सहाय्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून ही औषधे शोधण्यात आली आहेत.जर्नल हेलियोन यामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close