आरोग्य
कोपरगावात कोरोना रुग्ण वाढ केंव्हा थांबणार ?
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात सलग दोन दिवस कोरोना वाढीचा दर मंदावला असताना पुन्हा एकदा काल कोरोना विषाणूच्या साथीने उच्चान्क गाठला होता तर आज पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा कोरोना ३६ श्राव तपासणी नंतर बाधितांचा आकडा १६ ने वाढला झाली असून काल नगर येथे पाठलेल्या दहा श्रावांचा तपासणी अहवाल आला असून त्यात पाच बाधित रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या २१ झाली आहे.तर २० रुग्ण निरंक आले आहे.याशिवाय आज ४ रुग्ण बरे होऊन त्यानां घरी सोडून देण्यात आले आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०४ हजार ९०४ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा २५ लाख ९४ हजार ११२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ५० हजार ११२ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ५ लाख ८४ हजार ७५४ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू १९ हजार ७४९ वर जाऊन पोहचला आहे.
आज आलेल्या अहवालात साईनाथनगर येथे १ पुरुष (वय-५६),संजीवनी वसाहत १ पुरुष (वय-६९),समता नगर येथे एक पुरुष (वय-४६),सिद्धिविनायक नगर येथे एक पुरुष (वय-३३),कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळ एक पुरुष (वय-५२) व एक स्त्री (वय-५१),इंदिरापथ एक पुरुष (वय-४४),कृषी मित्र सोसायटी एक पुरुष (वय-६५) व एक मुलगी (वय-१०),विवेकानंदनगर तीन स्रिया (वय अनुक्रमे-६३,३७,११),गोदाम गल्ली तीन स्रिया (वय अनुक्रमे-६४,१३,१०),व गांधीनगर येथील अठरा वर्षीय युवक आदी सोळा रुग्णांचा त्यात समावेश असून उशिराने मिळालेल्या माहिती नुसार नगर येथील काल पाठवलेले अहवाल आज आले असून त्यात अजून पाच रुग्ण बाधित आढळले आहे.त्यात जोशींनागर येथील एक ३१ वर्षीय पुरुष,सोनेवाडी येथील एक ४० वर्षीय पुरुष,चांदेकसारे येथील एक ६० वर्षीय महिला, टिळक नगर येथील एक ४२ वार्षिय पुरुष,कोपरगाव राजपाल सोसायटी येथील ५७ वार्षिय पुरुष आदी पाच रुग्णांचा समावेश झाल्याने आता बाधित रुग्णांची संख्या २१ झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिक पुन्हा एकदा तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार ५२२ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत १२९ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत ५ बळी गेले आहे.तर आत्ता पर्यंत तालुक्यात शहरासह ४१९ रुग्ण बाधित झाले आहेत.आता क्रियाशील रुग्ण ९० असल्याची माहिती डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या यात ४२४ इतकी झाली आहे.त्यात ९० रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत ५ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.१९ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार २९२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ९ हजार १६८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १८.२८ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३२४ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ७७.३२ टक्के झाला असल्याची माहितीही डॉ.विधाते यांनी शेवटी दिली आहे.