शैक्षणिक
आत्मा मालिक गुरुकुलचा निकाल जाहीर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुळाच्या आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलची शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम राहिली आहे.या गुरुकुलाची विद्यार्थिनी कु.आदिती देठे हिने ९६ टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळविला तर कु. अक्षदा माळवे ९५.४५ टक्के द्वितीय व चि. साईदीप राऊत ९३.४० टक्के तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.दहावीच्या परीक्षेत गुरुकुलचे एकूण १९८ विद्यार्थी सहभागी होते.यात १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक, १३२ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, ५२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ०२ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त करत यश संपादन केले.
गुरुकुल चे प्राचार्य माणिक जाधव यांनी शालेय नियोजनात अतिरिक्त तासिका,सराव परीक्षा,विविध शैक्षणिक कार्यशाळा,निमंत्रित विषय तज्ञांचे मार्गदर्शन, दैनंदिन नियोजन,भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची वृत्ती व ध्यान-आध्यात्मिक संस्कार तसेच सर्व विद्यार्थी – शिक्षक कर्मचाऱ्यांचे परिश्रम यांची या यशात महत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
या विद्यार्थ्यांना उपप्राचार्य नितीन सोनवणे,मिनाक्षी काकडे,पर्यवेक्षक दत्तात्रय जावळे,बाळासाहेब गाडेकर,दिनेश क्षीरसागर सर्व वर्ग व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली,सर्व संतगण,ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष भगवान दौंड,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,प्रभाकर जमधडे,माधवराव देशमुख,प्रकाश भट,बाळासाहेब गोरडे, प्रकाश गिरमे,व्यवस्थापक हिरामण कोल्हे व पालकांनी अभिनंदन केले आहे.