जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

दारु चोरी प्रकरणी सहा तरुणासह ८५ हजाराचा ऐवज जप्त

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

साकुरी-(प्रतिनिधी)

सावळीविहीर ग्रामपंचायत हद्दीत नगर मनमाड रोड लगत बाबाज परमीट रुम बंद होते याचं संधीचा फायदा घेऊन एक लाख रुपये किंमतीच्या देशी विदेशी दारू बाटल्या चोरीला गेल्याची तक्रार चासनळी येथील महेंद्र गोविंदराव जोंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हयाची गंभीर दखल घेऊन सावळीविहीर येथील सहा आरोपींना तीन दुचाकी व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र या काळात परमीट रूम, बीअर बार व वाईन्स शॉप बंद करण्यात आले‌ आहे.त्यामुळे तळीराम चांगलेच अडचणीत आले होते. त्यातच बंद असलेले परमीट रूम वर काहीची नजर गेली व त्यातुन हि घटना घडली असल्याची माहिती हाती आली आहे.या दारुतुन या परिसरातील अनेक प्रतिष्ठितांनी आपला अनेक दिवसाचा “कोरोना उपवास” सोडल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र या काळात परमीट रूम, बीअर बार व वाईन्स शॉप बंद करण्यात आले‌ आहे.त्यामुळे तळीराम चांगलेच अडचणीत आले होते. त्यातच बंद असलेले परमीट रूम वर काहीची नजर गेली व त्यातुन हि घटना घडली असल्याची माहिती हाती आली आहे.या चोरी बाबत जिल्हा पोलिस प्रमुख अखिलेशकुमार,अपर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे,उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने तपास सुरू करण्यात आला होता.या बाबत कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगार पकडले गेले पाहिजे अशा सुचना देण्यात आल्या होत्या.पोलीस निरक्षक दिपक गंधाले, स.पो.नी. मिथुन घुगे, प्रवीण दातरे, वैभव रुपवते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे महेश नारायण कापसे यास ताब्यात घेण्यात आले चौकशीत भोलेनाथ विजय चंदरकर,आशिष बबन शेलार, विशाल अशोक आगलावे रा, सावळीविहीर यांनी परमीट रूम फोडले असुन मनोज विश्वनाथ वाघ, विजय भानुदास चव्हाण यांना विकुन मालाची विक्री देखील करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५०/२०२०भा.द.वि.कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या काळात या आरोपींनी सावळीविहीर सह लगतच्या काही गावातील प्रतिष्ठित लोकांना देखील दारु विक्री केली असल्याचे खात्रिलायक रित्या समजले आहे. तीन दुचाकी व दहा हजारांची दारु जप्त करण्यात आली आहे सहा आरोपींना राहाता न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान आपला दारूचा शोक पूर्ण दारुण घेणारे महाभाग कोण ? याची विविध चौका-चौकात चर्चा सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close