कोपरगाव तालुका
..या प्रतिष्ठाण कडून जंतूनाशक फवारणी सुरु
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणच्या वतीने “कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर प्रातिबंधात्मक विविध उपाय योजना सुरू केल्या असुन जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत जंतूनाशक फवारणी नुकतीच करण्यात आली आहे.
राज्यात या विषाणूने २०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २८ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.कोपरगाव तालुक्यात दोन महिलांना आपला प्राण गमवावा लागला आहे.देशभरात अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.रुग्णवाढ गत दोन-तीन दिवसात कमी होत असली तरी ती थांबलेली नाही.त्यामुळे अनेक ग्रामपंचायती प्रतिबंधात्मक उपाय योजना करत आहेत.या पार्श्वभूमीवर जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणने जेऊर कुंभारी गावातील वक्ते वस्ती,सोळके वस्ती, चव्हाण वस्ती,गुरसळ वस्ती,गायकवाड वस्ती,आदी ठिकाणी हि फवारणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरु केली आहे.
या वेळी भिमराज वक्ते,लक्ष्मण वक्ते,काशिनाथ वक्ते,बाळासाहेब गायकवाड,किशोर गायकवाड,कैलास चव्हाण,संदिप वक्ते, व शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुधाकर वक्ते,उपाध्यक्ष विशाल गुरसळ,सचिव महेश सोळके,नितीन वक्ते,राहुल वक्ते,राहुल चव्हाण,अक्षय चव्हाण,विकी जगताप,शरद चव्हाण,तुषार गुरसळ,प्रदिप गायकवाड,किरण चव्हाण,प्रदिप वक्ते,अक्षय गुरसळ,ॠषी गुरसळ,मनोज जगताप,गौतम गायकवाड,राहुल देवकर,रोहित जावळे,कुलदीपक वक्ते,विश्वजीत वक्ते,ऋशिकेश वक्ते,महेश मेहेत्रे, सुदर्शन कवडे,गौरव पवार,साईनाथ वायकर,साई सोळके,तसेच शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.