कोपरगाव तालुका
कोपरगावातील घरपट्टी,नळपट्टी रद्द करा-मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे,त्यामुळे सर्वच व्यावसायिक,दुकानदार,उद्योजक यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.त्यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने त्यांना तीन महिन्याची पाणीपट्टी व घर पट्टी माफ करावी अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव भाजपचे शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी कोपरगाव नगरपरिदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांचेकडे एक निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगाव नगरपालिका त्याला अपवाद नाही या हद्दीत टाळेबंदी अद्याप सुरूच आहे. सर्वांचे व्यवसाय,उद्योग धंदे गेल्या अनेक दिवसांपासून पूर्ण पणे बंद आहेत या बंद मुळे सर्व व्यापारी,छोटे मोठे व्यावसायिक यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे त्यांना या संकटात आर्थिक दिलासा मिळणे गरजेचे आहे.पालिकेने आपल्या हद्दीतील अशा सर्व व्यावसायिकांना नगरपालिकेच्या घर पट्टी व नळ पट्टीच्या करामधून तिन महिने सूट द्यावी-विनायक गायकवाड
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४०५ ने वाढून ती १६ हजार १२८ इतकी झाली असून ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ३ हजार ६४८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २११ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २८ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.देशातील एकूण राज्यांपैकी महाराष्ट्रात कोरोनाने सर्वाधिक कहर केला असून त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नगर जिल्हा शासनाने धोकादायक विभागात (रेड झोन) ठेवला असल्याने अद्यापही किती दिवस टाळेबंदी ठेवणार हे स्पष्ट झालेले नाही.त्यामुळे नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.अशा परिस्थितीत नागरिक,व्यापारी,दुकानदार,व्यावसायिक यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
कोपरगाव नगरपालिका त्याला अपवाद नाही या हद्दीत टाळेबंदी अद्याप सुरूच आहे. सर्वांचे व्यवसाय,उद्योग धंदे गेल्या अनेक दिवसांपासून पूर्ण पणे बंद आहेत या बंद मुळे सर्व व्यापारी,छोटे मोठे व्यावसायिक यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे त्यांना या संकटात आर्थिक दिलासा मिळणे गरजेचे आहे.पालिकेने आपल्या हद्दीतील अशा सर्व व्यावसायिकांना नगरपालिकेच्या घर पट्टी व नळ पट्टीच्या करामधून तिन महिने सूट द्यावी. नगरपालिकेने तिन महिन्याचा कर कमी केला तर सर्व छोटे मोठे व्यापारी यांना थोडाफार दिलासा मिळेल तरी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आणि सर्व नगरसेवक यांनी याचा विचार करावा व नुकसान झालेल्या सर्व व्यापारी बंधू भगिनींना थोडासा दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी आपल्या निवेदनात शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी शेवटी केली आहे.आता कोपरगाव पालिका नेमकी काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.