जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

पुढारपण सोडा आणि घरी बसा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

लोहगाव-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूची साथ हि धोकादायक असून गावातील ग्रामस्थांनी घरात बसूनच आपला वेळ घालवावा व ग्रामपंचायतीस व गावातील नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन लोहगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश चेचरे यांनी एका निवेदनाद्वारे आवाहन केले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा रोज आपल्या देशाला नागरिकांना अनेक माध्यमातून आवाहन करीत आहे या संसर्गजन्य रोगापासून वाचण्यासाठी एकच पर्याय आहेत तो म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरी आपण घरी थांबलो तरच आपण कोरोना व्हायरला हरवु शकतो तोच एक पर्याय आपल्याकडे आहे दुसरा पर्याय नाही. कोरोनावर कोणताही इलाज आपल्याकडे नाही-माजी सरपंच गणेश चेचरे

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ८ हजार ७३० इतकी झाली असून २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १३४ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ८९५ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.राहाता तालुक्यातील लोहगाव येथील काही नागरिकही त्याला अपवाद नाही.त्यांना या साथीच्या पार्श्वभूमीवरही पुढारपण करण्याची भारी हौस दिसत आहे.त्यांनी कृपया पुढारपण सोडा आणि घरी बसा हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे तरुणांना त्यांनी खास करून आवाहन केले आहे आज जे कोरोना विषाणू( कोव्हिड-१९) एकूण चित्र भयावह रूप धारण करीत आहे अनेक सामाजिक संस्था राजकीय पुढारी तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा रोज आपल्या देशाला नागरिकांना अनेक माध्यमातून आवाहन करीत आहे या संसर्गजन्य रोगापासून वाचण्यासाठी एकच पर्याय आहेत तो म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरी आपण घरी थांबलो तरच आपण कोरोना व्हायरला हरवु शकतो तोच एक पर्याय आपल्याकडे आहे दुसरा पर्याय नाही. कोरोनावर कोणताही इलाज आपल्याकडे नाही या पार्श्वभूमीवर माजी सरपंच गणेश चेचरे यांनी अजून वेळ गेलेली नाही गावातील व्यक्तींनी घरातील महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा तरुणांनी खासकरून स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी घरातच बसा ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे. जीवघेणा विषाणू आपल्या गावात प्रवेश करणार नाही याची खबरदारी घ्या. यासाठी गावाच्या वतीने तीन दिवस टाळेबंदी केलेले आहे व यासाठी तरुण वर्ग यांनी पुढाकार घेऊन गावातच थांबणे घरी बसून रहाणे महत्वाचे आहे विनाकारण रस्त्यावर फिरू नये जेणेकरून कोरोना सारखा संसर्ग आपल्या ग्रामीण भागात शिरकाव करणार नाही यासाठी तरुणांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी आपल्या पत्रकात शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close