जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात ..यांनी उभारले निर्जंतुकीकरण कक्ष

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात कोरोना विषाणूंचा रुग्ण आढळून आल्याने या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सुरक्षा घेण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात विविध सात ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली आहे.वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची भ्रमणध्वनिवरील वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक खाजगी डॉक्टरांनी आपली रुग्णतपासणी बंद केली असल्याचा दावा केला आहे.व नियमित तपासणीसाठी येणाऱ्या हृदयरोग,मधुमेह,रक्तदाब अशा रुग्णांची गैरसोय झाली होती.तसेच वातावरण बदलानुसार होणारे सर्दी,पडसे, ताप अशा रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याची कबुली दिली आहे.मात्र आणीबाणीच्या प्रसंगी दवाखाने बंद करणाऱ्या डॉक्टरवर कोणती कारवाई करणार या बाबत मौन पाळले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ८ हजार ७३० इतकी झाली असून २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १३४ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ८९५ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.कोपरगावात एक साठ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यासाठी विविध उपाय योजना करण्यासाठी विविध सामाजिक सहकारी संस्था पुढे येत आहेत.कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आगामी काळात टाळेबंदी उठल्यावर काही दिवस खबरदारी घ्यावी लागणार आहे.त्यासाठी नागरिकांचे हात निर्जंतुकीकरण करणे हि बाब अधोरेखित झाली आहे.हि गरज ओळखून कोपरगाव शहरात विविध सात ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्षाची निर्मिती करून ते पालिकेला अर्पण केले आहे.यामुळे विविध कारणांनी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे सोपे जाणार आहे.
यात श्री.साईबाबा तपोभूमी मंदिर, छत्रपती संभाजी महाराज चौक, कोपरगाव पोलीस ठाणे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती,तहसील कार्यालय,भगवा चौक गांधीनगर आदी ठिकानांचा समावेश आहे. हे कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे.

या प्रसंगी आ.आशुतोष काळे,तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. कृष्णा फुलसुन्दर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे,वैशाली बडदे,शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर आदी उपस्थित होते.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक खाजगी डॉक्टरांनी आपली रुग्णतपासणी बंद केली असल्याचा दावा केला आहे.व नियमित तपासणीसाठी येणाऱ्या हृदयरोग,मधुमेह,रक्तदाब अशा रुग्णांची गैरसोय झाली होती.तसेच वातावरण बदलानुसार होणारे सर्दी,पडसे, ताप अशा रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते.ही अडचण ओळखून आ.काळे यांनी अशा रुग्णांसाठी एम. डी.,एम.बी.बी.बी.एस.उच्च शिक्षित डॉक्टरांची मोफत सेवा दूरध्वनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close