जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

श्वसन विकार असणारे आता पाठवा जिल्हा रुग्णालयात-जिल्हाधिकारी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

अ,’नगर-(प्रतिनिधी)

जिल्‍हयातील सर्व खाजगी व्‍यवसायिक डॉक्‍टर यांना त्‍यांचे दवाखाना वा रुग्‍णालयात आलेल्‍या बाहयरुग्‍ण व आंतरुग्‍णामध्‍ये श्र्वसनाचा त्रास जाणवणारे (SARI) खोकला, ताप, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे असणारे रुग्‍ण आढळल्‍यास, त्‍यांना त्‍वरीत जिल्‍हा रुग्‍णालय अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.

लॉकडाउन लागू होऊन १३ दिवस लोटले आहेत. तरीही देशात करोनाच्या संसर्गाचा जोर कमी झालेला नाही. उलट दिवसागणिक रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशातील कोरोनाची लागण असलेल्या नागरिकांची संख्या ४५०२ मृतांचा आकडा १२५ च्या वर पोहोचला आहे.राज्यात आज ३३ ने वाढ होऊन ७८१ वर पोहचला आहे.तर जिल्ह्यात आज एकाने वाढ होऊन तो २२ वर पोहचला आहे. तर राज्यात मृतांचा आकडा ४ ने वाढून १२५ वर पोहचला आहे.त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे कोणतीही जोखीम उचलण्याची तयारी केली आहे.

राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड १९) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३,४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड-१९ वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहे. त्यानुसार, हे आदेश जारी करण्यात आले.

या पूर्वीच अहमदनगर जिल्‍हयातील सर्व खाजगी दवाखाने,सर्व रुग्‍णालये तसेच सर्व मेडीकल दुकाने त्‍यांचे दैनंदिन वेळेनुसार सुरु ठेवणेबाबत व आपत्‍कालीन परिस्थितीत खाजगी व्‍यवसायीक डॉक्‍टर यांनी दवाखाने बंद ठेवल्‍यास त्‍यांची नोंदणी रद्द करण्‍याचा प्रस्‍ताव पाठविण्‍यात येईल, असे आदेश जारी करण्यात आले होते.

केंद्र व राज्य शासनाने ज्यांना श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत आहे ( Severe Acute Respiratory Illnes (SARI)) अशा नागरिकांचे सर्व्‍हेक्षण करणेबाबत निर्देश दिले आहेत. त्‍यानुसार SARI रुग्‍णाची व्‍याख्‍या खालील प्रमाणे आहे. ज्या ०५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना अचानक सुरु झालेला ३८ अंश सेल्‍सीयस ताप असेल, खोकला, घशात खवखव जाणवत असेल, धाप लागणे, श्‍वास घेण्‍यास त्रास होणे आणि रुग्‍णालयात भरती करण्‍याची आवश्‍यकता भासत असेल तसेच याशिवाय, ज्या ५ वर्षाखालील मुलांना न्यूमोनिया असेल आणि रुग्‍णालयात भरती करण्‍याची आवश्‍यकता भासत असेल अशा व्यक्तींना सारी रुग्ण म्हणून ओळखले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close