जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात पोलीस कारवाईत माजी नगराध्यक्षासह २४ वहाने जप्त !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाने जगात खळबळ उडून देऊनही अद्याप नागरिकांत जाग येण्याची चिन्हे दिसत नसल्याने आज सकाळच्या सत्रात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कठोर कारवाईत ४ चारचाकी,तर १८ दुचाकी अशा २४ गाड्या पोलिसानी जप्त केल्या असून त्यात २००९ मध्ये कोपरगाव नगरपरिषदेत अध्यक्ष पदावर असलेल्या माजी अध्यक्षावरही कारवाई झाली असून त्यांची रेनॉल्ट डस्टर हि गाडी तीन महिने जप्त केली असल्याची माहिती कोपरगाव पोलिसानी दिली आहे.त्यामुळे नाठाळ नागरिकांत खळबळ उडाली आहे.

लॉकडाउन लागू होऊन १३ दिवस लोटले आहेत. तरीही देशात करोनाच्या संसर्गाचा जोर कमी झालेला नाही.या विषाणूने देशभरात ४३७५ जणांना लागण झाली आहे तर १२२ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्याता हीच संख्या सर्वाधिक ७८१ असून मृत्यू ४५जणांचे झाले आहे.त्यात नगर जिल्ह्यात आज पर्यंत २२ जणांना लागण झाली आहे तरीही काही नाठाळ नागरिक या साथीचे गांभीर्य समजून घ्यायला तयार नाही.पोलीस व महसूल,आरोग्य विभाग आपल्या डोळ्यात तेल व हातावर शीर घेऊन आपले घालून कर्तव्य बजावत आहे.तरीही काही नागरिकांना याचे गांभीर्य येत नसेल तर त्यानां केवळ परमेश्वरच वाचवू शकतो.

लॉकडाउन लागू होऊन १३ दिवस लोटले आहेत. तरीही देशात करोनाच्या संसर्गाचा जोर कमी झालेला नाही.या विषाणूने देशभरात ४३७५ जणांना लागण झाली आहे तर १२२ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्याता हीच संख्या सर्वाधिक ७८१ असून मृत्यू ४५जणांचे झाले आहे.त्यात नगर जिल्ह्यात आज पर्यंत २२ जणांना लागण झाली आहे तरीही काही नाठाळ नागरिक या साथीचे गांभीर्य समजून घ्यायला तयार नाही.पोलीस व महसूल,आरोग्य विभाग आपल्या डोळ्यात तेल व हातावर शीर घेऊन आपले घालून कर्तव्य बजावत आहे.तरीही काही नागरिकांना याचे गांभीर्य येत नसेल तर त्यानां केवळ परमेश्वरच वाचवू शकतो.दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. तरीही चार यूक्तीच्या चार गोष्टी टाळण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून येत असून त्याला कोपरगाव शहर व तालुका अपवाद नाही.त्यामुळे पोलीस प्रशासनाला आता कठोर होण्याचा प्रसंग आला असून आज सकाळच्या सत्रात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केलेल्या कठोर कारवाईत ४ चारचाकी,तर १८ दुचाकी अशा २४ गाड्या पोलिसानी जप्त केल्या असून त्यात कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष आर.डी. सोनवणे यांची रेनॉल्ट डस्टर क्रं. एम.एच.१७ बी.एस.०४ हि गाडी तीन महिने जप्त केली असून त्याच बरोबर शिंगणापूर येथील संदीप रमेश उंडे क्रं.एम.एच.१५ सि.व्ही.९४९४) या दोघांचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव पोलिसानी दिली आहे.त्यामुळे नाठाळ नागरिकांत खळबळ उडाली आहे.पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी सकाळी ११ वाजेच्या डॉ.आंबेडकर चौकात हि कारवाई सुरु केली व दुपारपर्यंत अविश्रांतपणे ती सुरु होती त्यावेळी अनेक नागरिक शासकीय कार्यालये व बँकांना महावीर जयंतीची सुट्टी असताना बतावण्या करताना आढळून आले त्यावेळी नागरिकांच्या या प्रतापावर हसावे की रडावे असा प्रश्न निर्माण होत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close