कोपरगाव तालुका
रेशनच्या धान्याची लूट, कठोर कारवाई करा-यांचे आदेश
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रेशन वाटप करतांना कोरोना विषाणूमुळे लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे घेतले जाणार नाहीत त्यामुळे रेशन वाटप करतांना लेखी नोंद करून वाटप करण्यात येणार असल्याचा या टोळीने फायदा उठवला आहे.दरम्यान या गोण्या ४१ दाखवल्या असल्या तरी त्या ८०० असल्याची विश्वसनिय माहिती आली आहे.हे आरोपी गुटखा आणण्यासाठी गेले असल्याने तेवढ्यात धाड पडली म्हणून योगायोगाने ते या धाडीत सापडले आहेत.यात मोठी टोळी अनेक वर्षांपासून समाविष्ट असून त्यात अनेक बडे राजकीय धेंड गुंतले असल्याची माहिती आहे.
संपूर्ण जगासह देश व राज्यात जीवघेण्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. इतर प्रगत देशांची कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करतांना जी धांदल उडाली अशी परिस्थिती आपल्या देशात निर्माण होऊ नये यासाठी पंधरा एप्रिल पर्यंत सम्पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.त्यामुळे आर्थिक दुर्बल कुटुंबावर उपासमारीची वेळ टाळण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय योजनेतील कुटुंबांना शिधा पत्रिकेवर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता व कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट श्री.साईबाबा तपोभूमी यांच्या वतीने ६ लाख ८३ हजार रुपयांचा धनादेश रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरावके यांच्याकडे सुपूर्द केला होता.मात्र अवघ्या काही दिवसातच कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका गोदामात टाकलेल्या धाडीत ४१ गोण्या तांदूळ अवैध मार्गाने विकताना एका टोळीला पकडले होते.विशेष म्हणजे ज्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त केला त्या रेशन संघटनेच्या अध्यक्षानेच हा डल्ला मारल्याने मोठी खळबळ उडाली होती.या पार्श्वभूमीवर आ. काळे यांचेकडून हा इशारा देण्यात आला आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत कोपरगाव तालुक्याला ८ हजार ८४५ क्विंटल तांदूळ प्राप्त झाले असून या योजने अंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील कुटूंबांना प्रति मानसी पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. असून या कुटुंबांना लवकरच या तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे मात्र वाटपाधीच त्याला पाय फुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, अंत्योदय योजनेतील ज्या कुटुंबांना रेशनवरील अन्न धान्य घेण्यासाठी पैसे नाहीत अशा कुटुंबासाठी महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट श्री.साईबाबा तपोभूमी कोपरगाव यांच्या यांच्यावतीने एक महिण्याचे मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यावर कुणी डल्ला मारणार नाही याची खबरदारी घ्यावी.हा अन्न धान्याचा पुरवठा करतांना हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी.रेशन वाटप करतांना कोरोना विषाणूमुळे लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे घेतले जाणार नाहीत त्यामुळे रेशन वाटप करतांना लेखी नोंद करून वाटप करण्यात येणार असली तरी यामध्ये परदर्शीपणा असावा.रेशनमध्ये मागील काही वर्षापासून सुरु असलेला काळा बाजार यापुढे चालणार नाही.रेशनचा काळा बाजार करणाऱ्या त्या आरोपींवर व त्यांना काळा बाजार करण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी त्यासाठी पुरवठा विभागाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.त्यासोबत या कुटुंबांनी आपल्याला दर महिन्याला मिळणारे रेशन घेऊन जावे असे आ.काळे यांनी शेवटी केले आहे.