जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

अशोक कानडे यांना पितृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वारी येथील वारकरी संप्रदायातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व संपूर्ण भगवत गीता मुखोदगत असणारे ह.भ.प.सुखदेव कारभारी कानडे (वय-८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी मुले,मुली,पुतणे,नातु असा मोठा परिवार आहे.ते कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक कानडें यांचे पिताश्री होते.

स्व.सुखदेव कानडे यांचे संस्कृत विषयात त्यांचे विशेष नैपुण्य होते.वारीचे ग्रामदैवत रामेश्वर भगवान व जगदंबा देवीचे ते निस्सीम भक्त होते संपूर्ण श्रीमद भगवत गीता त्यांची मुखोदगत होतीच त्या बरोबरच विष्णु सहस्रनाम,भजन काकडा हरिपाठ,अभंग,अनेक स्तोत्र मंत्र त्यांचे मुखोदगत होते.त्यांच्या निधनाने वारी परिसरात शोककळा पसरली आहे.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे व वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिष कानडे यांचे ते पिताश्री होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close