जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रामदास रहाणे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका देखरेख सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व बहादरपूर येथील प्रगतशील शेतकरी रामदास रहाणे (वय-६०) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,एक मुलगा,पाच मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर बहादरपूर येथील स्मशान भूमीत काल सायंकाळी ५.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

स्व.रामदास रहाणे हे माजी महसूल मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे निष्ठावान सहकारी मानले जात होते.त्यांनी आधीच्या कालखंडात अत्यंत प्रतिकूल काल अनुभवला होता.त्यांनी नाशिक जिल्ह्यात महावितरण कंपनीचे विद्युत ठेकेदार म्हणून आपला लौकिक स्थापित केला होता.ते बहादरपूर येथील गोपाजीबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व बहादरपूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष होते.

स्व.रहाणे यांना अलीकडील काळात त्यांना असाध्य व्याधीने ग्रासले होते.त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरु होते.मात्र त्यांना वाचविण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले नाही अखेर त्यांची प्राणज्योत काल सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मालवली आहे.ते विनायक रहाणे यांचे जेष्ठ बंधू होते.त्यांच्या निधनाने बहादरपूर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close