जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अर्थकारण

‘हर घर क्यु.आर.कोड योजनेमुळे महिलांना घरात बसून बचत करता येणार-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तेथील सहकारी पतसंस्था चळवळीतील अग्रणी मानल्या जाणाऱ्या समता पतसंस्थेने आपल्या सभासदांसाठी,हर घर क्यू.आर.कोड योजनेचा शुभारंभ करून महिलांना पैशांची बचत आणि सुरक्षित करण्याचा एक मार्ग खुला करून दिला असल्याचे प्रतिपादन डॉ.वैशाली फुलसुंदर यांनी कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“प्रत्येक घरातील पतीने पत्नीला घर खर्चासाठी रोख रक्कम दिल्यास ती रक्कम पत्नीकडून पर्स,डबे,देवघरात ठेवली जाते.ती रक्कम हरवणे किंवा चोरीला जाण्याची शक्यता असते.पण समताच्या क्यू.आर.कोडच्या माध्यमातून रोख रक्कम दिल्यास ती रक्कम सुरक्षित राहू शकते”-डॉ.वैशाली फुलसुंदर,कोपरगाव.

समता पतसंस्थेच्या उपाध्यक्षा श्वेता अजमेरे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव शहरातील निवारा परिसरात हर घर क्यू.आर.कोड योजनेचा शुभारंभ डॉ.वैशाली फुलसुंदर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्वेता अजमेरे या होत्या.

सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संचालक अरविंद पटेल,चांगदेव शिरोडे,कांतीलाल जोशी,गुलशन होडे,बाळासाहेब कापे,हर्षल जोशी,कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका दिपा गिरमे,जिजाबाई कापे, अनिता सरोदे,शोभा दरक,जोत्सना पटेल,चित्रा शिरोडे,मंगल लोणगावकर आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”प्रत्येक घरातील पतीने पत्नीला घर खर्चासाठी रोख रक्कम दिल्यास ती रक्कम पत्नीकडून पर्स,डबे,देवघरात ठेवली जाते.ती रक्कम हरवणे किंवा चोरीला जाण्याची शक्यता असते.पण समताच्या क्यू.आर.कोडच्या माध्यमातून रोख रक्कम दिल्यास ती रक्कम सुरक्षित राहू शकते आणि त्या रकमेला ७ टक्के व्याजदरही दिला जातो आणि घरात बसून बचत ही करता येऊ शकत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

सदर प्रसंगी निवारा परिसरातील महादेव मंदिर व हनुमान मंदिरासमोरील जागेत शेड साठी देणगी दिल्याबद्दल श्रीकांतलाल जोशी यांचाही सत्कार समता पतसंस्थेचे संचालक चांगदेव शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती उज्वला बोरावके यांनी केले आहे.तर सूत्रसंचालन ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार संस्थेचे महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close