गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात स्विफ्ट डिझायरने उडवले,एक जखमी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारातील ‘ओम साई लॉन्स’च्या समोर देर्डे फाट्याच्या जवळ शिर्डी कडे जाणाऱ्या दुचाकी (क्रं.एम.एच.१५ डी.ई.४७३६) स्वारास नाशिककडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीने (क्रं.एम.एच.०१ ए.एक्स.३०६४) अरुण लक्ष्मण घुमरे (वय-५८) रा.कोळगाव सांगवी,तालुका सिन्नर,यास जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यास संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची। माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथील चौकात वारंवार अपघात होताना दिसत आहे.गत सप्ताहात सहकार विभागाचे अधिकारी श्री पाटील यांच्या स्विफ्ट डिझायरला असाच अपघात होऊन ते त्यात गंभीर जखमी झाले होते त्या बातमीची शाई व वाळते न वाळते तोच नुकताच कोळगाव सांगवी या गावचा दुचाकीस्वार अरुण घुमरे यास मारुती स्विफ्टने उडवले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथील चौकात वारंवार अपघात होताना दिसत आहे.गत सप्ताहात सहकार विभागाचे अधिकारी श्री पाटील यांच्या स्विफ्ट डिझायरला असाच अपघात होऊन ते त्यात गंभीर जखमी झाले होते त्या बातमीची शाई व वाळते न वाळते तोच नुकताच कोळगाव सांगवी या गावचा दुचाकीस्वार अरुण घुमरे हा शिर्डी येथे मामाचे मुलास भेटण्यासाठी जात असताना समोरून रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून मारुती स्विफ्ट डिझायर या गाडीवरील चालकाने त्यास जोराची धडक दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान या ठिकाणी काळे कारखान्याकडे उसाने भरलेली बैलगाडी जात होती समोरून दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येत होता आणि शिर्डी कडून नाशिक दिशेने जाणारी स्विफ्ट डिझायर कार बैलगाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारास जोराची धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.परिसरातील लोकांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन करून संत जनार्दन स्वामी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान पोलीस ठाण्यात अजून गुन्ह्याची नोंद झालेली नाही मात्र घटनास्थळी पोलीस येऊन गेल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
शिर्डी मार्गे नगर-सिन्नर या राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६० महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे सदर रुंदीकरण करताना रस्त्याच्या दक्षिण बाजूला वस्ती करून राहणाऱ्या लोकांसाठी रस्ता ओलांडण्याची कुठलीही सोय संबंधित ठेकेदारांने न केल्यामुळे देर्डे फाटा ते झगडे फाटा या जवळजवळ तीन किलोमीटर अंतरामध्ये वारंवार अपघात होताना दिसत आहे. या भागात वस्ती करून राहणारे ग्रामस्थ तसेच त्या ठिकाणी असणारे मंगल कार्यालय या कार्यालयात लग्न समारंभ साठी जाणारे लोक यांना विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे अनेक प्रसंग वाढलेले दिसत आहेत त्यामुळे या रस्त्याच्या मधोमध एक रस्ता ओलांडण्यासाठी स्थान निश्चिती करणे गरजेचे बनले आहे.व तशी मागणी येथील परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी आमच्या प्रतींनिधिकडे बोलताना केली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.