जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

नववर्षाचे स्‍वागतासाठी शिर्डी साई संस्थानची तयारी पूर्ण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्या वतीने नाताळ सुट्टी,चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असुन यानिमित्‍ताने शनिवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“शिर्डीत साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात १० हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे.तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साईधर्मशाळा व भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) या ठिकाणी २८ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे.साईभक्‍तांकरीता सुमारे ३५० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात आलेले असून उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी सोय करण्यात आली आहे”-राहुल जाधव,प्र.कार्यकारी अधिकारी,साईबाबा संस्थान शिर्डी.

पुढे बोलताना श्री.जाधव म्‍हणाले,”दरवर्षी नाताळ सुट्टी,चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.या येणा-या साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात १० हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे.तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साईधर्मशाळा व भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) या ठिकाणी २८ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे.साईभक्‍तांकरीता सुमारे ३५० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात आलेले असून उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी श्री साईनाथ मंगल कार्यालय,व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह,मारुती मंदिराशेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स,गेट नंबर ०५, श्री साईप्रसादालय,सेवाधाम इमारत,शिर्डी विमानतळ व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे.
तसेच दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा,कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम),व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्‍या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याकालावधीत भक्‍तांच्‍या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, साईआश्रम व नविन श्री साईप्रसादालय आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असुन तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्‍तनिवासस्‍थान व नविन श्री साईप्रसादालय येथे रुग्‍णवाहीका तैनात ठेवण्‍यात येणार आहे. तसेच सुरक्षेकामी ०१ पोलिस निरिक्षक, ०६ पोलिस उपनिरिक्षक, ७५ पोलिस कर्मचारी, एक सिघ्र कृतीदल पथक, एक बॉम्‍ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्‍तासाठी अतिरिक्‍त ०४ पोलिस निरिक्षक, २२ सहाय्यक पोलिस निरिक्षक, २५० पुरुष पोलिस कर्मचारी व ६० महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्‍यात येवून याव्‍यतिरिक्‍त संस्‍थानचे ०१ पोलिस निरिक्षक व ९३० सुरक्षा कर्मचारी आहेत.
नाताळ सुट्टी,चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवा निमित्‍ताने शनिवार दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी विविध सां‍स्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले असून दुपारी ०२ ते ०३ यावेळेत श्री.जगदिश मारुती पाटील, ठाणे, दुपारी ०३ ते ०४ यावेळेत श्री साई स्‍वरांजली संगीत संच, नागपुर, दुपारी ०४.०० ते ०५.३० यावेळेत श्री.विजय पार्सेकर, मुंबई, रात्रौ ०७ ते ०८.३० यावेळेत सौ.भक्‍ती साखरकर, मुंबई व रात्रौ ०८.३० ते १० यावेळेत स्‍वरश्री प्रतिष्‍ठान (अंध व जेष्‍ठ नागरिक यांचा सहभाग), मुंबई आदी कलाकारांचे साईभजने व भक्‍ती गीतांच्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार असल्‍याचे सांगुन शिर्डी महोत्‍सवानिमित्‍ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या साईभजन संध्‍या कार्यक्रमांचा जास्‍तीत-जास्‍त श्रोत्‍यांनी लाभ घ्‍यावा असे आवाहनही श्री.जाधव यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close