जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

समताच्या…या शाखेच्या ठेवीत तब्बल २७ टक्क्यांनी वाढ-शाखाधिकारी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्रात समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या १६ शाखा असून त्यात ३० सप्टेंबर अखेर अ.नगर जिल्ह्यातील राहाता शाखेत ठेवी,कर्ज,सुरक्षित सोनेतारण कर्जामध्ये लक्षणीय वाढ झाली असून राहाता तालुक्यातील सर्वच वयोगटातील सभासदांना समताच्या योजना आणि उपक्रमांची माहिती करून देत संस्थेची मूल्ये आणि दृष्टीकोनांप्रमाणे अविरतपणे सेवा देण्याचे काम करत असल्याची माहिती संस्थेचे शाखाधिकारी मिलिंद बनकर यांनी दिली आहे.

राहाता शाखेची स्थापना ११ मे १९९६ रोजी करण्यात आली.आज राहता शाखेला २६ वर्ष पूर्ण झाली असून वर्षानुवर्ष या शाखेची आर्थिक घोडदौड सुरु आहे.३० सप्टेंबर अखेर राहाता शाखेच्या ठेवी ६५ कोटी ८८ लाख इतक्या झाल्या असून ठेवींमध्ये वार्षिक सरासरीने तब्बल २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.गत ६ महिन्यात राहाता शाखेच्या ठेवींमध्ये ७ कोटी ३७ लाख रुपये इतकी वाढ झाली आहे.एकूण कर्ज वाटप २७ कोटी १८ लाख रुपये केले आहे.सुरक्षित सोनेतारण कर्जामध्ये देखील राहाता शाखेने विशेष उच्चांक गाठला असून १२ कोटी ११ लाख रुपयांचे सोनेतारण कर्जाचे वाटप केले असल्याची माहिती राहाता शाखेचे शाखाधिकारी मिलिंद बनकर यांनी दिली आहे.

शाखेतील अत्याधुनिक सुविधांविषयी अधिक माहिती देताना शाखेचे सोनेतारण अधिकारी प्रवीण गमे म्हणाले की,”राहाता शाखेद्वारा जेष्ठ नागरिकांना घरपोहोच पेन्शन सुविधा,लाॅकर सुविधा, मोबाईल बॅकींग,आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी.,आय.एम.पी.एस.,क्यु.आर.कोड सुविधा,व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली, एस.एम.एस.यांसारख्या विविध सुविधा आणि योजना ग्राहक,सभासदांना देण्यात येत आहे.

समाजातील प्रत्येक व्यक्तींना पत निर्माण करून देत त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना ११ मे १९८६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी करण्यात आली.त्यानंतर बदलत्या काळानुसार समताच्या १६ शाखांच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासद हित जोपासत अविरतपणे सेवा देण्याचे काम केले जात आहे.

राहता शाखेच्या या आर्थिक घोडदौडीमध्ये समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,उपाध्यक्षा श्वेता अजमेरे,संचालक गुलाबचंद अग्रवाल,जितूभाई शहा,अरविंद पटेल,चांगदेव शिरोडे,कचरू मोकळ,रामचंद्र बागरेचा,संदीप कोयटे,गुलशन होडे,निरव रावलिया,संचालिका शोभा दरक,जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शाखेचे शाखाधिकारी बनकर,सोने तारण अधिकारी प्रवीण गमे,शुभम शेंडे आणि कर्मचारी यांचा विशेष सहभाग आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close