जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात आठ लाखांची धाडसी चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील साईबाबा चौकानजीक असलेल्या महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या व्यापारी संकुलातील गाळा क्रं.११मधील रामदास माधव राजुडे यांच्या मालकीच्या श्रीराम मोटर्स मधील शटरचे कुलूप तोडून त्यातील सुमारे सात ते आठ लाखांच्या तांब्याच्या तारा रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या ठिकाणी नगरपरिषदेचा साईबाबा नाका ते अण्णाभाऊ साठे पुतळा या मार्गावरील विद्युत पथदिवे लागत नसल्याने या मार्गावर अंधार असतो.त्याचा फायदा चोरट्यानी उचलला असल्याचा आरोप या ठिकाणी असलेल्या दुकानदारांनी केला आहे.व या ठिकाणी बंद असलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील मूळ रहिवासी असलेले व्यापारी व इलेक्टरीक मोटार दुरुस्तीचा व्यवसाय असलेले कुशल दुकानदार यांचा भाडे तत्त्वावरील व्यापारी गाळा आहे.ते नेहमी प्रमाणे काल सायंकाळी आपले दुकान बंद करून गेले असता आज सकाळी त्यांना त्यांच्या एका ओळखीच्या इसमाचा फोन आला व त्याने तुमच्या गाळ्याचे शटर लावण्याचे कुलपाजवळ छंणीने तोडून आत काही तरी गडबड झालेली दिसत असल्याचा दूरध्वनी आला. दुकानदार रामदास राजुडे हे त्यावेळी दुकानात येतच असताना त्यांना ही खबर मिळाली.त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने त्यांचा गाळ्यास कुलूप अडकविण्याच्या धातूच्या पट्ट्या अज्ञात हत्यारांच्या साहाय्याने तोडून आतील बऱ्याच वस्तूंची फेकाफेक केलेली आढळून आली.त्यांनी बारकाईने त्याबाबत शोध घेतला असता त्यांच्या इलेक्टरीक मोटार भरण्याची तांब्याच्या धातूची सुमारे सातशे ते आठशे किलो तार अज्ञात चोरट्यानी चोरून नेलेली आढळून आली आहे.

त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कोपरगाव शहर पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तत्काळ चौकशी अधिकारी आर.पी.पुंड याना घटनास्थळीं पाठवून पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला असल्याची बातमी प्राप्त झाली आहे.

दरम्यान या ठिकाणी नगरपरिषदेचा साईबाबा नाका ते अण्णाभाऊ साठे पुतळा या मार्गावरील विद्युत पथदिवे लागत नसल्याने या मार्गावर अंधार असतो.त्याचा फायदा चोरट्यानी उचलला असल्याचा आरोप या ठिकाणी असलेल्या दुकानदारांनी केला आहे.व या ठिकाणी बंद असलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close