कोपरगाव तालुका
कोपरगावात मुरलीधर मंदिर ट्रस्टची “ती” इमारत अंशतः कोसळली,दुचाकी चक्काचूर !
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील जुन्या गावठाण हद्दीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील व गाववेशीच्या शेजारील मुरलीधर मंदिर ट्रस्टची सुमारे पंच्याहत्तर वर्षा पूर्वीची उत्तर मुखी इमारत रात्री साडे दहाच्या सुमारास अंशतः कोसळल्याने त्या मलब्याच्या खाली सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची हिरो एच. एफ.डिलक्स (एम.एच.17 सी.एफ.380) हि दुचाकी सापडून तिचा चक्काचूर झाला आहे तथापि त्यात सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.त्या मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच गावातील जीर्ण झालेल्या इमारती व त्यांच्या मालकांना नोटिसा बजावून सदरच्या इमारती स्वतःहून पाडून टाकण्याचे निर्देश दिले होते.मात्र त्याकडे बऱ्याच नागरिकांनी दुर्लक्ष केले.ज्या नागरिकांनी या नोटिसा स्वीकारल्या नाहीत त्यांच्या दारावर त्या चिकटुनही उपयोग झालेला दिसत नाही.तसा तो झाला असता तर सराफ बाजार पेठेत मध्यवस्तीत हनुमान मंदिर समोर असलेल्या मुरलीधर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने त्याची दाखल घेऊन धोकादायक असलेली व मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेली हि जीर्ण इमारत केव्हांच पाडली असती मात्र दुर्दैवाने तसे झालेले नाही.
जुन्या गावठाण हद्दीतील नागरिकांचे दैव बलवत्तर म्हणून सदर इमारतीच्या वरच्या व्हरांडीचा भाग बऱ्याच अंशी कोसळला मात्र त्यावेळी सदरचा रस्ता रात्र झाली असल्याने निर्जन झाला होता त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.तरी त्या रस्त्यावर त्याच इमारतीच्या आडोशाने उभी केलेली हिरो कंपनीची दुचाकी मात्र या अपघाताला बळी पडली असून दुचाकीस्वार तुषार जाधव यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान त्याच इमारतीत संस्कृतचे जुने जाणते पंडित व शरद कुलकर्णी यांचे मामा गोविंद बळवंत पाठक (वय-90) हे वरच्या मजल्यावर रहात होते त्यानां बाहेर काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीसांना मोठे प्रयत्न करावे लागले त्यांनी इमारतीतून बाहेर पडण्यास नकार दिला होता.खालच्या मजल्यावर एक सुवर्णकार व सुवर्ण कारागीर यांची दुकाने आहेत.तथापी सुवर्णकाराचे दुकान बंद आहे.म्हणून मोठा अनर्थ टळला आहे.दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेने याची तातडीने दाखल घेऊन सदरचा रस्ता संरक्षक लाकडी जाळ्या लावून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केला आहे.व इमारत पाडण्यास आज सुरुवात करणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रश्न सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.