जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव विधानसभा मतदार संघात घड्याळा पाठोपाठ कमळही गायब ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र भरण्यास वेग आला असला तरी अद्याप तालुक्यात नेते आणि त्यांची पक्षांतरे हा विषय अद्यापही ऐरणीवरच असून राष्ट्रवादीच्या घड्याळापाटोपाठ भाजपचे कमळही गायब झाल्याची घटना उघड झाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सत्ताधारी लोकप्रतिनिधी व त्याचे पतीराज यांनी पक्षाचे नाव टाळले असल्याची विश्वसनीय खबर असून त्यात त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांचे स्पष्टपणे नावही वगळले असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.त्यामुळे त्याच्या उमेद्वारीवरच प्रश्नचिन्ह असल्याचे स्पष्ट होत आहे.बोलण्याच्या ओघात त्यांनी केवळ, “आपल्याला पक्षाचे चिन्ह मिळायला पाहिजे तर खरे “असे म्हणून आपल्याच बोलण्यातून आत्मविश्वास गमावल्याचे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत असल्याने कार्यकर्त्यांचा विश्वासही डळमळीत झाला आहे.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या 288 जागांसाठी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून अद्याप भाजप व शिवसेनेची युती जागा वाटपापर्यंत पोहचली नसल्याचे आजच्या दिवसभरच्या घडामोडीवरून दिसून येत आहे. तरी कोपरगावात या यूतीवरच बरीच समीकरणे अवलंबून असल्याचे दिसत आहे.राज्यात भाजप व शिवसेना आपल्या युतीबाबत अद्याप जागांची कोंडी फोडण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.भाजप व शिवसेना आपल्या पक्षातील बंडोबांना थंड करण्यासाठी हि चाल खेळत आहेत.तर दुसरीकडे काही जागा वादग्रस्त असल्याने त्यावर अद्याप कोंडी फुटण्याची शक्यता दिसत नसल्याने या बाबत दिल्लीत बैठक होऊनही त्यावर तोडगा दृष्टिपथात दिसत नाही.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दि. ३० सप्टेंबर रोजी एकूण नामनिर्देशन पत्रे – ४७ ( एकूण ६६ ) तर उमेदवारांची संख्या – २७ ( एकूण ३९)अशी असून दाखल नामनिर्देशन पत्र -2 आहेत.नामनिर्देशन पत्र नेणाऱ्यात आ. स्नेहलता कोल्हे,आशुतोष काळे,बाळासाहेब कारभारी जाधव,विनायक मुरलीधर गायकवाड,नितीन मनोहर शिंदे,रावसाहेब चांगदेव टेके, कैलास बोरावके,नितीन पोळ,चंद्रकांत बागुल,शफिक समा सय्यद या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.

आज नामनिर्देशन पत्र भरण्याचा पाचवा दिवस होता बऱ्याच जणांनी आपले नामनिर्देशनपत्र नेले खरे मात्र अद्याप भरलेले नाही.कोपरगावात राजेश परजणे विजय वहाडणे यांनी आपले नामनिर्देशन पत्र नेले आहे त्यात वहाडणे यांनी आपले नामनिर्देशन कुठलाही गाजावाजा न करता सकाळी अकरा वाजता भरला आहे.विनाकारण कार्यकर्ते व सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे अभद्र प्रदर्शन त्यांनी टाळून टाकले आहे.तर दुसरीकडे सत्ताधारी गटाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात सत्ताधारी गटाच्या शहर कार्यकर्त्यांच्या काल सायंकाळी झालेल्या बैठकीत नैऋत्यगडावरील नेते मंडळी हजर होती.मात्र या मेळाव्याला उपस्थिती जेमतेम असताना या मेळाव्यात सत्ताधारी पक्षाचे चिन्ह” कमळ “हेच गायब झाल्याचे आढळून आले आहे.तर सत्ताधारी लोकप्रतिनिधी व त्याचे पतीराज यांनी पक्षाचे नाव टाळले असल्याची विश्वसनीय खबर असून त्यात त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांचे स्पष्टपणे नावही टाळले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.त्यामुळे त्याच्या उमेद्वारीवरच प्रश्नचिन्ह असल्याचे स्पष्ट होत आहे.बोलण्याच्या ओघात त्यांनी केवळ, “आपल्याला पक्षाचे चिन्ह मिळायला पाहिजे तर खरे “असे म्हणून आपल्याच बोलण्यातून आत्मविश्वास गमावल्याचे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत असल्याने कार्यकर्त्यांचा विश्वासही डळमळीत झाला आहे.त्यामुळे पक्षाचा व या नेत्यांमधील अविश्वास उघड झाल्याचा संदेश कार्यकर्त्यांत गेल्याचे मानले जात आहे’ त्यामुळे कोपरगाव तालुक्यात घड्याळ जसे बेवारस झाले आहे त्याच पाठोपाठ कमळाला हि वाली राहणार कि जाणार याचे चर्वीत-चर्वण सुरु झाले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close