जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेच्या कार्यालयाला कुलूप ?

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आता रुग्णवाढ बऱ्यापैकी नियंत्रणात आलिया असताना आज एक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागात दोन अधिकारी,एक चालक आदी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याने बांधकाम विभागाला चार दिवस टाळेबंदी करण्याची नामुष्की ओढवली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी पालिकेचे काम काही दिवस बंद ठेवण्याची मागणी अध्यक्ष विजय वहाडणे यांचेकडे केली आहे.त्याला त्यांनी दुजोरा दिला आहे.

कोपरगाव पालिकेत मागील आठवड्यात वसुली विभागात काही रुग्ण आढळले होते त्यानंतर मध्यन्तरी हि संख्या नियंत्रणात आली होती.मात्र काल काही संशयित आढळले असून त्यात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांचे चालक व बांधकाम विभागातील दोन जण असे चार जण बाधित असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.त्या मुळॆ आता पालिका कर्मचारी चांगलेच हादरले असून यावर त्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.व कार्यालय बंदची मागणी पुढे आली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ४१ हजार ४१९ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ६७२ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत सप्ताहात दिवसात चार बळी गेल्याने त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे.आज आलेल्या यादीत शहरात १४ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात १५ असे २९ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०१ हजार ८३६ झाली आहे.त्यात १२९ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७९ टक्के आहे.आतापर्यंत ०८ हजार ५९२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ३४ हजार ३६८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.३६ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १ हजार ६७४ इतकी झाली आहे.शहरात पालिकेने व पोलीस प्रशासनाने केलेल्या कामाने कोपरगाव शहरात आता कोरोना चांगल्यापैकी नियंत्रणात आला आहे.असे असता आता ज्यांनी अथक प्रयत्न करून नागरिकांचे जीवित वाचविले त्यांनाच लागण होण्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.कोपरगाव पालिकेत मागील आठवड्यात वसुली विभागात काही रुग्ण आढळले होते त्यानंतर मध्यन्तरी हि संख्या नियंत्रणात आली होती.मात्र काल काही संशयित आढळले असून त्यात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांचे चालक व बांधकाम विभागातील दोन जण असे चार जण बाधित असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.त्या मुळॆ आता पालिका कर्मचारी चांगलेच हादरले असून यावर त्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.त्यामुळे आता पालिकेचा बांधकाम विभाग आता किमान चार दिवस तरी बंद ठेवावा अशी मागणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे यांनी केली असून त्याला अध्यक्ष विजय वहाडणे यांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे आता पालिका रविवार पर्यंत बंद राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close