धार्मिक
वारकरी मंडळाच्या विभागीय सचिवपदी जगताप
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नाशिक विभागीय मुख्य सचिवपदी येवला तालुक्यातील देशमाने येथील ह.भ.प.प्रदीप महाराज जगताप यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांनी दिली आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळाची नुकतीच एक बैठक संपन्न झाली असून या बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.त्यात प्रदीप जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदी ह.भ.प.अनिल महाराज वाळके यांची निवड केली आहे.प्रदीप जगताप यांनी या आधी कोपरगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी काम केले आहे.सन-२००९ साली तुकाराम महाराजांचे जन्म चतुर्षताब्दी वर्षानिमित्त आयोजित गाथा पारायण सोहळ्यानिमित्त सामाजिक काम केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल वरिष्टानी घेतली आहे.त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व विभागीय अध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बोगील,उपाध्यक्ष संतोष महाराज मोरे,ज्ञानेश्वर महाराज सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.यापूर्वी जगताप यांनी कोपरगाव तालुक्यातील सहकारात आघाडीवर असलेल्या कोळपेवाडी येथील कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्यात सेवा बजावलेली आहे.