जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

कालवा सल्लागार समितीची त्वरित बैठक घ्या…या नेत्याची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   चालू वर्षी राज्यासह कोपरगाव मतदारसंघात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून संपूर्ण परिसराला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.परंतु धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे भरलेली आहेत हि काहीशी दिलासादायक बाब असली तरी लाभधारक शेतकऱ्यांना वेळेत मिळावी यासाठी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक घ्यावी असे साकडे आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना दिलेल्या निवेदनात घातले आहे.

  "दारणा धरणात पाणी असले तरी शिल्लक पाणी पुढील वर्षी पाऊस सुरु होईपर्यंत पुरवण्याचे मोठ आव्हान आहे.अशा परिस्थितीत वाढत असलेली उष्णता त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन पाहता धरणात किती पाणी शिल्लक राहील याचा अंदाज बांधणे कठीण आहे.त्यामुळे गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी किती आवर्तन कधी मिळणार याकडे लाभधारक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.आर्थिक अडचणी असतांनाही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके उभी केली होती परंतु पुन्हा एकदा लहरी हवामानाचे बळी शेतकरी ठरले आहे.त्यासाठी पाणी सल्लागार समितीची बैठक तातडीने घेणे गरजेचे बनले आहे"-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   राज्यात दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणावर दाटले असून शेतकऱ्यांना रब्बी पिकाची चिंता सतावत आहे.गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात पर्जन्य बेताचा झाला असल्याने या चिंतेत भर पडली आहे.त्यामुळे आगामी रब्बी पिकांची सर्व भिस्त आता कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाकडे लागली आहे.त्यामुळे या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी ही मागणी केली आहे.

आ.आशुतोष काळे.

  त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”एल निनोच्या प्रभावामुळे राज्यासह संपूर्ण कोपरगाव मतदार संघात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे जरी धरणे भरलेली असले तरी शिल्लक पाणी पुढील वर्षी पाऊस सुरु होईपर्यंत पुरवण्याचे मोठ आव्हान आहे.अशा परिस्थितीत वाढत असलेली उष्णता त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन पाहता धरणात किती पाणी शिल्लक राहील याचा अंदाज बांधणे कठीण आहे.त्यामुळे गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी किती आवर्तन कधी मिळणार याकडे लाभधारक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.आर्थिक अडचणी असतांनाही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके उभी केली होती परंतु पुन्हा एकदा लहरी हवामानाचे बळी शेतकरी ठरले आहेत.त्यामुळे खरीप हंगाम जरी हातातून गेला तरी रब्बी हंगामातून काही तरी पदरात पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.त्यासाठी त्यांना गोदावरी कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन कसे असेल याची अचूक माहिती होणे आवश्यक आहे.उपलब्ध पाण्याचा विचार करून त्यांना पिकांची निवड करता येणे शक्य होणार आहे.त्यासाठी तातडीने कालवा सल्लागार समितीची बैठक घेणेबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करावे असे आ.काळे यांनी दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close