शैक्षणिक
… या ठिकाणी गांधी विचार संस्कार परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
“गांधीजींचे जीवनकार्य,स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि समाजपरिवर्तनाचा संदेश विद्यार्थ्यांना समजावा,तसेच त्यांच्यात सामाजिक बांधिलकी,बंधुभाव,प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित व्हावी,यासाठी हा उपक्रम एस.एस.जी.एम.महाविद्यालयात गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगाव यांच्या वतीने गांधी विचार संस्कार परीक्षा घेण्यात आली आहे.

महात्मा गांधी यांचे सत्य,अहिंसा,शांती,स्वावलंबन आणि नैतिक मूल्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे”हा परीक्षेचा उद्देश होता.या परीक्षेसाठी महाविद्यालयातील १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
सदर विचार संस्कार परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना गांधीजींच्या प्रेरणादायी प्रसंगांचा परिचय झाला असून सामाजिक व नैतिक मूल्यांची जाणीव दृढ होण्यास मदत होणार आहे.प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी परीक्षास्थळी भेट देत परीक्षेसाठी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.विचार संस्कार परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्र.उपप्राचार्य रवींद्र हिंगे,पर्यवेक्षक माधव रेवगडे आणि परीक्षा समन्वयक ज्ञानेश्वर झांबरे यांसह शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले होते.



