उद्योग
जिल्ह्यात २१ हजार कोटींची गुंतवणूक केली – ..या मंत्र्यांची माहिती.

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यात २१ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.राज्य सरकारने शिर्डीत ०४ हजार कोटींचा संरक्षण प्रकल्प सुरू केला त्यात ०२ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.गाव तेथे उद्योजक ही संकल्पना राबविणार आहे.दहा हजार लोकसंख्येत ०५ उद्योग निर्माण करणार आहे.राज्यातील तरुणांना नोकरी करणारे बनवणाऱ्या ऐवजी रोजगार देणारे बनवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांनी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक संकुल येथे सकाळी ११.३० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत आनंद नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी शिंदेवसेनेच्या राज्यसभा खा.ज्योती वाघमारे,विधानपरिषद आ.विवेक कोल्हे,आ.अमोल खताळ,आ.विठ्ठलराव लंघे,परमानंद महाराज,निजानंद महाराज,खा.वाकचौरे यांच्या धर्मपत्नी सरस्वती वाकचौरे,सेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,या आयोजनात महत्वाची भूमिका निभावणारे अजिंक्य रहाणे,माजी संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार,ग्राहक मंचचे माजी जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर,
आदी प्रमुख मान्यवरसंह मोठ्या संख्येने उच्च शिक्षित तरुण उपस्थित होते. सदर कार्यक्रम तब्बल अडीच तास उशिरा सुरू झाला असल्याने तरुणात नाराजी दिसून आली आहे.

यावेळी पुढे बोलताना मंत्री सावंत म्हणाले की,”या नोकरी मेळाव्याबाबत खा.वाकचौरे यांचे कौतुक केले आहे.तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग सुरू करावे असे आवाहन केले आहे.राज्याचा समतोल विकास व्हावा यासाठी आमचे प्रयत्न आहे.शिर्डीत ०४ हजार कोटींचा संरक्षण प्रकल्प सुरू केला त्यात ०२ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.नगर जिल्ह्यात २१ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.गाव तेथे उद्योजक ही संकल्पना राबविणार आहे.दहा हजार लोकसंख्येत ०५ उद्योग निर्माण करणार आहे.तरुणांना रोजगार देणारे बनवणार आहे.नगर जिल्ह्यातील मतदारसंघात आपण उद्योगी तरुणांना निधी द्यायला तयार आहे.त्यांना कौशल्य निर्माण करण्याचे काम केलं पाहिजे.तरुणांनी आपल्या नंतर दुसरा उद्योजक निर्माण होईल याची अंमलबजावणी करणे सहज शक्य होईल.यावेळी राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने बँकांनी वसुली करू नये असे आवाहन केले आहे.शेतकऱ्यांना शिकवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे.विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फी घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.त्यावेळी एम.पी.एस.सी.आंदोलनाचा दाखला देत त्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये.याबाबत आमचे सरकार पारदर्शक असल्याचा दावा केला आहे.संवैधानिक मागण्या पूर्ण केल्या जातील मात्र चुकीच्या मागण्या मान्य करणार नाही.पुढील पिढी सुसंकृत बनली पाहिजे असे सरकारचे धोरण आहे.तरुण उद्योग निर्माण करणे गरजेचे आहे.स्थानिक रोजगार निर्माण होण्यासाठी आमचा प्राधान्यक्रम आहे.त्यावेळी त्यांनी नोकरी मेळावा आयोजित करणाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

यावेळी आ.विवेक कोल्हे यांनी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी तरुणांना नोकरीची संधी आपल्या मतदारसंघात घेऊन आल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले असल्याचे कौतुक केले आहे.
यावेळी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.त्यावेळी ते म्हणाले की,”राज्याची शिंदे सेनेची धुरा मंत्री उदय सावंत यांचे खांद्यावर असून ते कायम व्यस्त असतात.या कार्यक्रमाला पाच हजार तरुण उपस्थित असून १२५ कंपन्या आल्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे.शिर्डी आणि जिल्ह्यात आणखी एक औद्योगिक वसाहत निर्माण होत आहे.सहकारी औद्योगिक वसाहती असून त्यांचे काही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.अकोले तालुक्यात औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे.मतदार संघात कौशल्य व कृषी प्रकिया,धार्मिक पर्यटन, महिला उद्योग,विकास केंद्र सुरू होणे गरजेचे आहे.त्यासाठी त्यांनी डाऊच या ठिकाणी राजा राम यांनी आपल्या वडिलांचे पिंडदान केल्याची आठवण करून दिली आहे.शिर्डी मतदार संघात जिल्हा उद्योग केंद्र व्हावे अशी मागणी केली आहे. शेतीच्या उद्योगाला वीज मिळणे गरजेचे आहे.शिर्डी विमानतळावर कृषी उद्योगासाठी कार्गो सेवा उपलब्ध करून द्यावी,आदी मागण्या केल्या आहेत.
यावेळी परमानंद महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.यावेळी प्रारंभी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्योग मंत्री उदय सावंत यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित वाकचौरे यांनी केले आहे.तर सूत्रसंचलन यांनी केले आहे तर आभार मुकुंद शिनगर यांनी मानले आहे.



