क्रीडा विभाग
क्रिकेट स्पर्धेत…या कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत,आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम अँड ज्युनिअर कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले आहे.आता हा संघ ऑक्टोबर महिन्यात संगमनेर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला असल्याची माहिती उपलब्ध झाली असून या स्पर्धेत हा संघ कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार आहे.

दरम्यान अंतिम सामन्यात जी.पी.एस.संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात चार बाद 51 धावा केल्या 52 धावांच्या लक्ष आत्मा मालिक संघाने 6.1 षटकात तीन बाद 54 धावा काढून पूर्ण केल्या होत्या.विजेत्या संघातील खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कुलच्या मैदानावर नुकतीच हि क्रीडास्पर्धा संपन्न झाली आहे.त्यात तालुक्यातील तेरा शालेय संघांनी सहभाग घेतला होता.त्यात आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल,रेन बो इंटरनॅशनल स्कूल,समता इंटरनॅशनल स्कूल,के.जे.सोमय्या साकरवाडी,बी.एम.टी विद्यालय कोपरगाव,के. बी.पी.विद्यालय कोपरगाव,संजीवनी विद्यालय संजीवनी,जी.पी.एस विद्यालय कोळपेवाडी,शारदा इंग्लिश मीडियम कोपरगाव आदिंचा समावेश होता.गौतम पब्लिक स्कूल व समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवीला आहे.
दरम्यान अंतिम सामन्यात जी.पी.एस.संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात चार बाद 51 धावा केल्या 52 धावांच्या लक्ष आत्मा मालिक संघाने 6.1 षटकात तीन बाद 54 धावा काढून पूर्ण केल्या होत्या.विजेत्या संघातील खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे.प्राचार्य नुर शेख,तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नितीन निकम,एस.जी.विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य मकरंद कोऱ्हाळकर,गौतम पब्लिक स्कुलचे क्रिडा प्रशिक्षक रमेश पठारे तसेच विजेत्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत शर्मा,राहुल रोकडे,दयानंद राठोड,क्रिकेट विभाग व्यवस्थापक संदीप बोळीज आदि मान्यवर उपस्थित होते.विजेत्या संघातील खेळाडूंचे संत जंगलीदास महाराज,संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,प्राचार्य माणिक जाधव,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक आदींनी अभिनंदन केले आहे.



